शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मालखेड पर्यटनस्थळ बनले वाहनतळ

By admin | Updated: July 6, 2016 00:18 IST

नजीकच्या मालखेड येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे.

बागेत घाणीचे साम्राज्य : केवळ दोन सफाई कामगार, सिंचन विभागाचे दुर्लक्षमनीष कहाते अमरावतीनजीकच्या मालखेड येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. केवळ दोन महिला सफाई कामगार येथे कार्यरत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे निदर्शनास येत आहे. बगिच्यामध्ये अनेक वाहने उभी आहेत. त्यामुळे हा बगीचा आहे की वाहनतळ, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो पर्यटक येथे येतात. परंतु त्यांना कोणत्याही सोयीसुविधा कंत्राटदारामार्फत पुरविल्या जात नाहीत. सिंचन विभागाने ११ महिन्यांकरिता सुमारे ३० लाख रुपयांमध्ये कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ कंत्राटदाराला चालविण्याकरिता देण्यात आला. परंतु बगिच्यामध्ये पाण्याचे ठिकठिकाणी डबके साचले आहेत. स्विमिंग पुलाच्या पाण्यात किडेमृतावस्थेत आढळून येत आहेत. पाणी अस्वच्छ आहे. पाण्याच्या बाटल्या ठिकठिकाणी पडल्या आहेत. बगिच्यातील झाडे नियोजनाअभावी वाळलेली आहेत. डब्बे पार्टीकरिता आलेल्या पर्यटकांकरिता कचरा कुंडीची व्यवस्था नाही. कागदाचे तुकडे गवतावर दिसत आहे. महिलाकरिता कपडे बदलविण्यासाठी एकच छोटीशी रुम आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. पायऱ्याचे दगड पूर्ण उखडलेले आहेत. गवतही सुकलेले आहेत. स्विमिंग पुलावरचा धबधबामधील पाणी बाजूला पडते. त्यामुळे अनेक पर्यटकांचे पाय घसरून दुखापत झाल्याची घटना येथे घडल्या आहेत. कृष्णाजी सागर प्रकल्प सन १९७४ साली पूर्ण झाला. १० वर्षांपूर्वी पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले. तेव्हा पर्यटन स्थळाची संपूर्ण मालकी सिंचन विभागाची होती. परंतु दरवर्षी तोटा होत होता. त्यामुळे एका खासगी कंत्राटदाराला सदर पर्यटन स्थळ चालविण्याकरिता दिले. परंतु चांगल्या सोयीसुविधा निर्माण होऊ शकल्या नाही. त्यामुळे भविष्यात सुधारणा न झाल्यास पर्यटन स्थळाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.