अमरावती : शहरातील व्यावसायिक क्षेत्रातील मोठी वीजचोरी महावितरणने नुकतीच उघड केली. तब्बल ८७८८ युनिटची चोरी करणाऱ्या राजापेठस्थित राहुलकुमार मनमोहन बंग (५०) विरूद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हे नोंदविला. १३ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
राजकमल वीज वितरण केंद्रांतर्गत वीजजोडणी तपासणीचे काम सुरू असताना राहुल बंग यांच्या नावे असलेल्या मीटरची तपासणी दरम्यान मीटरमध्ये छेडछाड केल्याचे लक्षात आले. बंग यांनी मायक्रो कंट्रोलवर लिक्विड टाकून वीज मीटरचा प्लस बंद करून वीजवापर सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले. आरोपीने ८७८८ युनिट (१ लाख ८३ हजार ४९८ रुपये)ची चोरी केल्याची तक्रार अजय चोपडे (३८) यांच्या दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
//////////
गांधी आश्रम भागातही चोरी
गांधी आश्रम भागातील रमेश इंगळे याने १३३ युनिट वीजचोरी केली. मात्र, तडजोडीनंतरही त्याने ते देयक भरले नाही. म्हणून १५ सप्टेंबर रोजी त्याच्याविरूद्ध राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. प्रीतेश मोखळेंच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हे नोंदविले. १४४ युनिटची चोरी करणाऱ्या सुरज जोधळे (रा. गांधी आश्रम) याच्याविरूद्ध देखील १५ सप्टेंबर रोजी राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तर, १८२ युनिटची चोरी करणार्या संतोष थोरात व ८३१ युनिटची चोरी करणार्या बंडू गायकवाड (दोघेही रा. गांधी आश्रम) यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
//////////