शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार

By admin | Updated: May 24, 2017 00:09 IST

अंजनगावातील सावकारपुरा भागात १० दिवसांपूर्वी जप्त केलेल्या रकमेच्या तुलनेत सुर्जी भागातील लाल चौकात एका दुकानावर धाड टाकून जप्त केलेली रक्कम नगण्य होती.

आयपीएल सट्टा प्रकरण : परिचित लोकांकडून स्वीकारायचेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगावातील सावकारपुरा भागात १० दिवसांपूर्वी जप्त केलेल्या रकमेच्या तुलनेत सुर्जी भागातील लाल चौकात एका दुकानावर धाड टाकून जप्त केलेली रक्कम नगण्य होती. हा सट्टा घेणाराच मुख्य सूत्रधार असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनीच डमी ग्राहक बनून सट्टा लावला.या प्रकरणात प्रफुल्ल फुलारी व दीपक मंडलिक यांना अटक करण्यात आली होती. सट्टा घेणारा पान मटेरिअलचा व्यवसाय व गुटखा विक्री करणारा जवळच्या मित्राकडून सट्टा स्वीकारत होता. त्याआधारे पोलिसांनी पथक तयार करून ठाणेदारांनी हा प्रकार उघडकीस आणला. मात्र यात मोठे घबाड हाती लागले नाही. सट्टा घेणारा मद्यस्थाने याने पोलिसांना गुटखा विक्रे त्याच्या हालचालीची माहिती दिली. पोलिसांना स्वत: डमी ग्राहक बनून साध्या वेशात मध्यस्थाच्या माध्यमातून सट्टा लावला. त्याच्यावर गोपनीय कॅमेऱ्याच्या माध्यामतून नजर ठेवण्यात आली. गुटका विक्रेत्याने सट्ट्याची रक्कम स्वीकारताच त्याला अटक केली. त्याने मोठा सट्टा स्वीकारला असावा, असा संशय आल्याने सट्टा चालविणाऱ्यास अटक करण्याची भीती दाखविली. मात्र, आरोपीने विरोध दर्शविला नाही.शहरात घडलेल्या दोन सट्टा प्रकरणांची चर्चा चौकाचौकांत आहे. "लोकमत"ने हे प्रकरण लावून धरल्याने हा विषय वाचकांत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी पकडलेले आरोपी वगळता. याच्याशी संबंधित अन्य लोकांचे रहस्य मात्र कायम आहे. छायाचित्रावरून उडाली शहरात खळबळअंजगनगाव क्रिके ट सट्ट्यातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकरचा फोटो "लोकमत"ने प्रसिद्ध करताच अंजनगाव सुर्जीमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा छडा अंजनगाव पोलिसांनी लावून संजय उदापूरकर यास अटक करून दाखविण्याचे धाडस करावे, अशी चर्चा अंजगावात चौकाचौकांत सुरू आहे. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळीपासूनच "लोकमत"च्या या वृत्ताची चांगलीच चर्चा होती. अमरावतीचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी यावर कारवाई सुरू केली. आम्ही मुख्य आरोपी अटक करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. "लोकमत"ला मिळालेल्या माहितीनुसार अमरावती पोलीस अधीक्षकांनी अंजनगावच्या ठाणेदाराशी बोलून या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ग्रामीण पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहिती मिळाली आहे.