शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘महफिल इन’चा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात !

By admin | Updated: March 24, 2016 00:27 IST

मंजूर नकाशाच्या तुलनेत अतिरिक्त वाढीव बांधकाम करण्यात आलेल्या ‘महफिल इन’सह रंगोली पर्लचा मुद्दा पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या हाती आला आहे.

उच्च न्यायालयाचे निर्देश : प्रकरण अवैध बांधकामाचेअमरावती : मंजूर नकाशाच्या तुलनेत अतिरिक्त वाढीव बांधकाम करण्यात आलेल्या ‘महफिल इन’सह रंगोली पर्लचा मुद्दा पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या हाती आला आहे. त्यानुसार मंगळवारी पुन्हा एकदा हॉटेल महफिल इनची पुनर्मोजणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वासंती नाईक आणि न्या. ए. एस. चांदूरकर या द्विसदस्यीय पीठाने महफिल इन संदर्भात २३ फेब्रुवारीला याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. दंडाच्या रकमेबाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी वैयक्तिकरित्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, याशिवाय याचिकाकर्ते काही अतिरिक्त दस्ताऐवज देत असतील तर ते दोन आठवड्याच्या आत स्वीकारावेत, अशी सूचना द्विसदस्य खंडपीठाने केली होती. त्यानुसार सोमवारी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हॉटेल महफिल इनच्या संचालकांचे म्हणणे ऐकून घेतले व पुनर्मोजणी करण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्यांना पुनर्मोजणीचा दस्तऐवजअमरावती : मंगळवारी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसह झोन अधिकाऱ्यांनी हॉटेल महफिल इनची पुनर्मोजणी केली. पुनर्मोजणीचा दस्ताऐवज याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी हॉटेल महफिल इनला अतिरिक्त अवैध बांधकामापोटी सुमारे १.२१ कोटींचा दंड ठोठावला होता. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात महफिल इनच्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्त्यांची सुनावणी देण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने दोन्ही याचिका निकाली काढल्यात. त्यामुळे महफिल इनच्या हॉटेलच्या दंडाची रक्कमेचा मुद्दा पुन्हा एकदा आयुक्तांकडे परतला आहे. असाच निर्णय रंगोली पर्ल हॉटेलबाबतही देण्यात आला आहे. दरम्यान, रंगोली पर्लबाबतची सुनावणी बुधवारी टळली.न्यायालयीन निर्देशाप्रमाणे याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यांना पुन्हा वाजवी संधी देण्यात येईल. - चंद्रकांत गुडेवारमहापालिका आयुक्तमला याबाबत बोलयचेच नाही. सारे काही आयुक्तांनाच माहीत आहे. त्यांनाच विचारा. - गोपाल मुंदडासंचालक, हॉटेल महफिल इन