शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या साहाय्यासाठी ‘महाशरद’ पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST

अमरावती : दिव्यांगांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी, यासाठी विविध सहायक उपकरणांची आवश्यकता असते. त्याचवेळी ...

अमरावती : दिव्यांगांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी, यासाठी विविध सहायक उपकरणांची आवश्यकता असते. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहायक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साधनांची कमतरता जाणवते. हा दुवा साधण्यासाठी शासनाने ‘महाशरद’ नावाने वेब पोर्टल कार्यान्वित केले आहे.

दिव्यांगाना सुविधांसाठी शरद (सिस्टीम फॉर हेल्थ अँड रिहॅबिलेटेशन असिस्टन्स फॉर दिव्यांग) हे अभियान १२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यान्वित पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींना तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करु इच्छिणाऱ्या व्यक्ती व संघटनांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिव्यांगांना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी, यासाठी विविध सहायक उपकरणांची आवश्यकता असते. त्यांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी, आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्याआधारे सहायक उपकरणे निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यानंतरही मर्यादित साधनसंपत्तीअभावी त्यांची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहायक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नाही. हा दुवा साधण्यासाठी एक विश्वासाधारित व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हे पोर्टल सुरु केले आहे. पुण्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ (मुंबई) हे संयुक्तपणे हे अभियान राबवतील.

बॉक्स

दुवा साधण्यासाठी व्यासपीठ

जनगणनेवेळी दिव्यांगत्वाच्या सहा प्रकारांची तरतूद होती. २०१६ च्या कायद्यात २१ प्रकारांची तरतूद केल्याने त्यानुसार अद्ययावत माहिती उपलब्ध करुन घेणे आवश्यक होते. दिव्यांग व्यक्तींमध्ये जनजागृती करून माहिती उपलब्ध करण्यासाठी व या दिव्यांगांना दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना यांच्याकडून मदत मिळवून देणे व या दोहोंमध्ये दुवा साधण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून पोर्टलद्वारे अभियान राबविण्यात येणार आहे.

बॉक्स

एक वषाच्या कालावधीसाठी अभियान

पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ हे विश्वास आधारित (ट्रस्ट बेस्ड) असून, नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती हे दोघेही या व्यासपीठाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू शकतील. हे अभियान एक वर्षाच्या कालावधीचे असेल. यात सहभागी होण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या सोयीसवलतीचा लाभ घेण्यास पात्र असावा.