शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

सालबर्डीतील दारुगुत्त्यांवर मध्य प्रदेश पोलिसांचे धाडसत्र

By admin | Updated: August 27, 2015 00:30 IST

श्रीक्षेत्र सालबर्डीत दारुविक्रीला उधाण आल्याचे वृत्त २४ आॅगस्टला लोकमतमध्ये प्रकाशित होताच मध्य प्रदेशच्या आठनेर पोलिस ठाण्यातील ...

प्रभाव लोकमतचामोर्शी : श्रीक्षेत्र सालबर्डीत दारुविक्रीला उधाण आल्याचे वृत्त २४ आॅगस्टला लोकमतमध्ये प्रकाशित होताच मध्य प्रदेशच्या आठनेर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सालबर्डी परीसरातील हातभट्टी दारु गुत्यावर धाड टाकली. पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हे नोंदविले.श्रावण महिन्यात सालबर्डी येथील महादेवाच्या भुयारात पिंडीच्या दर्शनासाठी भाविक येतात. या संधीचा लाभ घेण्यासाठी थेट पहिल्या पायरीवर पूजा साहित्य, उपाहारगृह, चहापानाच्या टपरी लावून बसलेल्या दुकानातून विदेशी दारुसोबतच हातभट्टी दारुची विक्री केली जाते. भुयाराकडे जाणाऱ्या मार्गावरही अशीच दुकाने लावली आहेत. भुयारात पुरुष मंडळीच नव्हे तर महिलासुध्दा मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. दारु मुबलक असल्यामुळे, दारु पिवून, झिंगलेल्या स्थितीत पुरुष भक्त मंडळी भुयार मार्गावर आढळून येते. या प्रकाराचा महिलांना विशेषत: त्रास होतो. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या कारणामुळे निर्माण होतो. मध्य प्रदेशातील आठनेर पोलिसांच्या अखत्यारीतील मोर्शी पोलीस अवैध दारु विक्री थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई करु शकत नाही. अमरावती जिल्हा पोलिस प्रशासनाने थेट बैतुल जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क करुन या संदर्भात माहिती देऊन सालबर्डीतील हा प्रकार बंद करण्याची विनंती केल्याचे कळते. याच अनुषंगाने कालच आठनेर पोलीस ठाण्यातील दोन सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पटेल आणि रघुवंशी यांनी पो.कॉ. पंजाबराव खंजारे यांच्यासह सालबर्डी परिसरातील झुणकारी येथे हातभट्टीच्या दारु निर्मिती गुत्त्यावर धाड टाकली. पोलिसांच्या धाडसत्राला विरोध करण्यासाठी लोकांचा जमाव गोळा झाला होता, तथापि पोलिसांनी आग्नेयास्त्र त्यांचेवर रोखल्यावर ही मंडळी पळून गेल्याचे सहा पोलिस उपनिरीक्षक बी एस पटेल यांनी ’लोकमत’शी बोलतांना सांगीतले. या प्रकरणी पळून गेलेल्या तिघा आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. हे पथक सायंकाळ झाल्यामुळे आणि पर्यटक निघून गेल्यामुळे त्यांना अवैध दारु विक्री करणारे मिळाले नाही.(तालुका प्रतिनिधी)