शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील धरणांत अत्यल्प जलसाठा !

By admin | Updated: July 1, 2016 00:05 IST

काटेपूर्णात सहा दिवसांचा साठा; बुलडाण्यातील चार प्रकल्पांची पातळी शून्यावर; पावसाळ्य़ात जलसंकट तीव्र!

राजरत्न सिरसाट/अकोलापश्‍चिम वर्‍हातील धरणांच्या पानलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणांची पातळी आता कमालिची खालावली असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३७ कोटी लिटर (0.४३ टक्के)म्हणजे सहा दिवसांचाच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्हय़ातील तर चार प्रकल्पाची पातळी शून्य टक्के असल्याने पावसाळ्य़ात वर्‍हाडातील जलसंकट तीव्र झाले आहे. दरम्यान, काटेपूर्णा धरणात १ सें.मी.जलपातळीत वाढ झाल्याने सर्वांंच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. इतर धरणांची मात्र दारू ण परिस्थिती आहे.मागीलवर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने धरणांच्या जलपातळीत वाढ झाली नव्हती. परिणामी, यावर्षी पाणी वितरण तोलून मापून करावे लागले. यावर्षी पाऊस चांगला व दमदार होणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने सर्वांंच्याच आशा पल्लवित झाल्या; परंतु पावसाळ्य़ाचे तीन आठवडे संपले तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पूरक पाऊस झाला नाही. परिणामी, धरणांची जलपातळी तळाला पोहोचली आहे.* बुलडाण्यातील ४ धरणं शून्य टक्के बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा या मोठय़ा धरणांसह पलढग, मस व कोराडीत शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाण्यातीलच नळगंगा व पेनटाकळी या मोठय़ा धरणांत अनुक्रमे ३.३३ व २.४५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तोरणा ३.0४ व उतावळी मध्य प्रकल्पात ५.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मसमध्ये ९.१५ तर ज्ञानगंगा प्रकल्पात १६.३0 टक्के जलसाठा आहे.**अकोल्यातील दगडपारवा कोरडे, उमा शून्य टक्केअकोला जिल्हय़ातील दगडपारवा धरण मागच्या वर्षापासून कोरडेच असून, उमा मध्यम धरणात शून्य टक्के साठा आहे. मोर्णा ३.३८ तर निर्गृणा धरणात ३.५४ टक्केच जलसाठा आहे.*** वाशिम जिल्ह्यातील एकबूर्जी धरणात २.६ तर अडान धरणात १३.७१ जलसाठा शिल्लक आहे.

काटेपूर्णा धरणात १ सें.मी.जलसाठय़ात वाढ !अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात १ सें.मी. ने वाढ झाली; परंतु धरणातील जलसाठय़ात चांगली वाढ होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.