शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘खो’

By admin | Updated: June 5, 2015 00:31 IST

यंदाचा खरीप हंगाम चार दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे.

खरीप चार दिवसांवर : कर्ज पुनर्गठनही नाही, उद्दिष्टांच्या १२ टक्केच वाटपगजानन मोहोड अमरावतीयंदाचा खरीप हंगाम चार दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे. शासनानेही शेतकऱ्यांच्या कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करून नव्याने कर्ज द्यावे, असे आदेश दिले आहेत. परंतु ३० मे रोजीचा पीककर्ज वाटपाचा अहवाल पाहता जिल्हा सहकारी बँकेशिवाय अन्य राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी पीककर्ज वाटपाला हरताळ फासल्याचे दिसून येते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण उद्दिष्ट्यांच्या ५३ टक्के पीक कर्जाचे वाटप मे अखेर केले आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँका १२ टक्के व ग्रामीण बँकांनी २६ टक्के कर्जवाटप केले आहे. हे वाटप जिल्हा सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाच्या निम्म्याच प्रमाणात आहे. खरीप २०१५-१६ करिता १६९५ कोटी ४४ लाख इतका पीककर्ज वाटपाचे लक्षांक आहे. या तुलनेत ४९ हजार ८०६ शेतकऱ्यांना ४४१ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे एकूण उद्दिष्ट्यांच्या २६ टक्के इतके आहे. जिल्हा सहकारी बँकेला खरिपासाठी ५६३ कोटी २७ लाख रूपयांचे लक्षांक असताना ३० मे पर्यंत ३५ हजार ७७५ शेतकऱ्यांना ३०० कोटी ५६ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, हे लक्षांकाच्या ५३ टक्के आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना खरिपासाठी ११२२ कोटी ९८ लाख रूपयांचा लक्षांक आहे. त्या तुलनेत १३ हजार ७११ शेतकऱ्यांना १३८ कोटी ७१ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. १५ जूनपर्यंत कर्जाचे पुनर्गठनमागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षांसाठी १५ जूनच्या आत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाचे आदेश तसेच नाबार्ड, भारतीय रिझर्व बँक यांचे निर्देश आहेत. परंतु बँकांची सध्याची प्रगती पाहता पुनर्गठन प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत.जिल्हा सहकारी बँकेची खरीप कर्ज वाटपाची सुरूवात एप्रिलपासून होते. त्या तुलनेत कमर्शिअल बँकांचे कर्जवाटप मे महिन्यापासून म्हणजेच उशिरा होते. त्यामुळे हा कर्जवाटपाचा फरक आहे. मागील कर्जाचे पुनर्गठन १५ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)जिल्हा बँका सोसायट्यांमार्फत कर्जवाटप करतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळते. कमर्शिअल बँका एकेका शेतकऱ्याला कर्ज देतात. शेतकरी स्वाक्षरी देत नाहीत. त्यामुळे पुनर्गठनास विलंब होत आहे. -अनंत खोरगडे, व्यवस्थापक, अग्रणी बँक.