शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सदाभाऊंच्या निर्देशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:49 IST

शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, ....

ठळक मुद्देडीएमओला सूचना नाहीत : नाफेडच्या अटी-शर्तीनुसारच होतेय सोयाबीनची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर तेथे दिले. अध्यादेशाची गरज नाही, मी सांगतोय तोच अध्यादेश, असेहीे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याद्वारे शासनानेच शेतकºयांना दिलेल्या ग्वाहीला रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समित्या व नाफेडच्या खरेदी केंद्रांना भेटी देऊन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. नाफेडच्या केंद्रावर अटी व शर्तीमुळेच खरेदी मंदावली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्पादनाच्या तुलनेत सोयाबीनची खरेदी नगण्य प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यंत्रणेला निर्देश दिलेत. सोयाबीनमध्ये कचरा असल्यास चाळणी मारून ते खरेदी करा, सात-बारावरील नोंदी न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स घ्या तसेच आधी चांगल्या प्रतीचे व नंतर तुय्यम प्रतीचे सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शेतकरीहिताचे धोरण शासनाद्वारा जाहीर झाल्याने सदाभाऊंच्या या निर्देशाला राज्यस्तरावर प्रसिद्धी मिळाली. मात्र, रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यासह सर्वत्र नेहमीच्याच पद्धतीने खरेदी सुरू झाली. डीएमओंशी संपर्क साधला असता, मुंबईच्या बैठकीत निर्देश मिळाले नाहीत तसेच सद्यस्थितीत शासनाचे कोणतेच निर्देश व अध्यादेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीनची आर्द्रता कमी झाल्यावर वजनदेखील कमी होणार असल्याने या घटलेल्या वजनाचा फरक कोण देणार, याविषयीचे कोणतेच दिशानिर्देश नाहीत. त्यामुळे देखील नाफेडच्या केंद्रांवर प्रचलीत पद्धतीनेच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात दहा केंद्रांवर नाफेडद्वारा ६८३ शेतकºयांचे १४ हजार ३५३ क्विंटल, तर व्यापाºयांनी ५ लाख ६५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तीचा भडीमार आहे, तर मोजणीचा वेग नसल्याने केंद्रांसह खासगी विक्रीत व्यापाºयांद्वारा शेतकºयांची लूट होत आहे.नाफेड केंद्रावरची शासन खरेदीसोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून ११ केंद्रांवर ५७६ शेतकºयांकडून १२ हजार ३२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ४४७ क्विंटल, अमरावती १६१, अंजनगाव सुर्जी ६६०, चांदूर बाजार १८६, चांदूर रेल्वे १५६०, धामणगाव रेल्वे ६७२३, मोर्शी ६९८, नांदगाव खंडेश्वर ७८७, दर्यापूर ८४ व तिवसा १०१४ क्विंटलची खरेदी करण्यात आली, तर धारणी व वरूड तालुक्यात खरेदी निरंक आहे.अशी आहे व्यापाºयांची खरेदीयंदाच्या हंगामात व्यापाºयांद्वारा ५ लाख ६५ हजार १८७ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये ३,६१,२५० क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १६,८४०, चांदूर रेल्वे १५,९१५, धामणगाव रेल्वे ७९,०४९, चांदूरबाजार २१,०५४, तिवसा ६५, मोर्शी २१,०३३, वरुड ७०४, दर्यापूर १३,९१५, अंजनगाव सुर्जी १४,५२३, अचलपूर १४,१०९ व धारणी तालुक्यात ६,७३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर नाफेडचे ग्रेडर सोमवारपासून उपलब्ध झालेले आहेत. सोयाबीन खरेदीसंदर्भात कोणतेही नव्याने आदेश, अध्यादेश नाहीत. नेहमीप्रमाणे खरेदी सुरू आहे.- रमेश पाटीलजिल्हा मार्केटिंग अधिकारी.