शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

पेट्रोल पंपावर लुटमार

By admin | Updated: December 3, 2015 00:12 IST

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातून पैसे हिसकावून पळ काढला.

मालवीय चौक : फाटक्या नोटीसाठी वादअमरावती : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातून पैसे हिसकावून पळ काढला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मालवीय चौकातील पेट्रोल पंपावर घडली. पसार झालेले आरोपी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शहर कोतवाली पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मालवीय चौकात जाजोदिया यांचा पेट्रोल पंप आहे. तेथे जाकीर कॉलनीतील रहिवासी फिरोज खान बिसमिल्ला खान (२३) हा कर्मचारी मंगळवारी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करीत होता. दरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंप बंद करताना दोन युवक एका दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आले. त्यांनी फिरोजला ३० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. त्यांनी फिरोजला ५० रुपये दिले. फिरोजने दोन दहाच्या नोटा दुचाकीस्वाराला दिल्या. मात्र, एक दहाची नोट फाटकी असल्यामुळे दुचाकीस्वारांनी ती नोट परत केली. तीन हजार रूपये घेऊन पसार अमरावती : फाटक्या नोटीवरून फिरोज व दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. फिरोजने ती नोट बदलून देण्यासाठी पैशांच्या बॅगमध्ये हात टाकला असता त्या अज्ञात दुचाकीस्वाराने फिरोजच्या हातातील ३ हजार १६५ रुपये हिसकावून पलायन केले. फिरोजने या घटनेची माहिती तत्काळ पेट्रोलपंप मालकाला देवून शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.