शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर

By admin | Updated: October 31, 2015 01:00 IST

दिवाळीचा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयकर विभागाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात ‘स्टॉक’ गोळा केला आहे.

धाडसत्रासाठी पथक तयार : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमिवर होणार कारवाईअमरावती : दिवाळीचा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयकर विभागाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात ‘स्टॉक’ गोळा केला आहे. यावर आता आयकर विभागाची करडी नजर राहणार धाडसत्र राबवून कारवाई करण्याकरिता पथक गठित करण्यात आले. दिवाळीपूर्वीच व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याची जय्यत तयारी आयकर विभागाने केल्याची विश्वसनीय माहिती आहे. विदर्भात अमरावतीत कापडाची मोठी बाजारपेठ आहे. तयार कापड, साखर, धान्य, कापूस आदी जीवनावश्यक साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. कापड व्यवसायातून दरदिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना कर चुकविणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. महापालिकेच्या सीमेबाहेर साकारण्यात आलेल्या नागपूर महामार्गावरील ‘बिझीलँड’ व्यापारी संकुलात यापूर्वी आयकर विभागाने धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली होती. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमिवर मालाचा ‘स्टॉक’ असलेली स्थळे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाकडे रिटर्न्स न भरणाऱ्या प्रतिष्ठानांची यादी तयार केली आहे. व्यापाऱ्यांनी आयकर अदा केल्यानंतर त्यात काही संशयास्पद आढळते काय? हे तपासण्याचे काम युध्दस्तरावर सुरु असल्याची माहिती आहे. माल ‘स्टॉक’ करताना त्याचे विवरण आयकर विभागाकडे दिले जात नाही. आयकरच्या दृष्टीने ही शुध्द चोरी असली तरी ‘स्टॉक’ ताब्यात घेतल्यानंतर दर वाढवून ही कारवाई केली जाते. सण, उत्सवाच्या काळात व्यापारी मालाचा ‘स्टॉक’ दाखवित नाही. ही कर चुकवेगिरी ठरते. आता आयकर विभागाने माल साठवून ठेवण्याचे गोदाम लक्ष्य केले आहे. पुढील आठवड्यात दुकाने, प्रतिष्ठानांवर धाडसत्र राबवून ‘स्टॉक’ तपासला जाईल, अशी माहिती आहे. त्यासाठी कर निरीक्षकांची चमू गठित करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या दुकानांचे ‘स्टॉक’ तपासणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.