शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव सट्टा प्रकरणावर शासनाच्या हेरखात्याची नजर

By admin | Updated: May 20, 2017 00:43 IST

डोळे विस्फारणाऱ्या रकमांचा व्यवहार असलेल्या आणि प्रतिष्ठित धनिकांचा समावेश असलेल्या सावकरापुरा येथील

एसपींची भेट : पोलिसांची चुप्पी, जनतेत उत्सुकता लोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : डोळे विस्फारणाऱ्या रकमांचा व्यवहार असलेल्या आणि प्रतिष्ठित धनिकांचा समावेश असलेल्या सावकरापुरा येथील आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर शासनाच्या हेरखात्याची नजर असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील या ताुलका मुख्यालयात अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असतात. सट्ट्याला या तालुक्यात नियमित ग्राहक असतात. सट्टाप्रेमींची ही आवड हेरून आयपीएल क्रिकेट सट्टाही अंजनगावात काही महिन्यांपासून सुरू करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या तालुका मुख्यालयावर जिल्ह्यातील पोलीस आणि इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची थेट नजर नसल्याचा गैरफायदा घेऊन आयपीएल क्रिकेट सट्टा भयमुक्त वातावरणात चलविला गेला. मतभेद आणि अंहकार याकारणांनी तो उघड झाला. तालुकास्तरावरील सदर सट्ट्याची चर्चा मंत्रालयापर्यंत पोहोचली. ठाणेदार जसे याप्रकरणी मौन बाळगून आहेत, तसेच पोलीस खात्याचे बडे अधिकारीही चुप्पी साधून आहेत. याप्रकरणात एकूण काय घडामोडी घडतात, त्यावर गृहखात्याची नजर आहे. प्रशासन कार्यक्षम असावे, असा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. यागंभीर प्रकरणी पोलीस प्रशासन कसे ‘रिअ‍ॅक्ट’ होत आहे, याबाबतची माहिती मुंबईपर्यंत पोहोचू लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार यांनी गुरूवारी येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. सट्ट्याबाबत त्यांची कुठलीही भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांची भेट सट्ट्याच्याच अनुषंगाने होती.