लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापूर येथील प्रचार कार्यालयाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.दर्यापूर नगर परिषदेच्या अध्यक्ष नलिनी भारसाकळे व आमदार रमेश बुंदीले यांच्या प्रमुख उपस्थितीत युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते उद्घाटन थाटात पार पडले. यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे अध्यक्ष कमालकांत लाडोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा टेंभरे, गजू पाटील वाकोडे, विधानसभा संघटक रवि कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट, शहरप्रमुख रवि गणोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंदराव अडसूळ यांनी मान्यवरांच्या भेटी घेतल्या.
Lok Sabha Election 2019; दर्यापुरात अडसुळांच्या प्रचार कार्यालयास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:48 IST
लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापूर येथील प्रचार कार्यालयाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.
Lok Sabha Election 2019; दर्यापुरात अडसुळांच्या प्रचार कार्यालयास सुरुवात
ठळक मुद्देप्रचाराचे धूमशान : ठिकठिकाणी मान्यवरांच्या भेटीचा धडाका