शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतविभाजनावर शिवसेनेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:52 IST

महाआघाडीने नवनीत राणा या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात एकच गहजब झाला होता. हा उद्रेक निस्तरण्यात वरिष्ठांना यश आले. मात्र, मतभेद मिटलेत तर मनभेद मात्र उघड दिसू लागले आहेत. आता ‘मोदी लाट’ ओसरली असल्याने युतीच्या शिलेदारांना वास्तवाचे भान आले.

ठळक मुद्देअमरावती लोकसभा : ‘मोदी लाट’ ओसरली, विधानसभेच्या रंगीत तालमीसाठी इच्छुक सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाआघाडीने नवनीत राणा या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात एकच गहजब झाला होता. हा उद्रेक निस्तरण्यात वरिष्ठांना यश आले. मात्र, मतभेद मिटलेत तर मनभेद मात्र उघड दिसू लागले आहेत. आता ‘मोदी लाट’ ओसरली असल्याने युतीच्या शिलेदारांना वास्तवाचे भान आले. सहा महिन्यांवर विधानसभा येऊन ठेपली आहे. त्यानिमित्त रंगीत तालमीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघात अहमहिका लागली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे आनंदराव अडसूळ अन् महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांच्यात २०१४ प्रमाणेच यावेळीही थेट लढत आहे. विशेष म्हणजे मतांचे ध्रुवीकरण करण्यास राणांना येत असलेले अपयश हे युती उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे आहे.विधानसभानिहाय आढावा घेता, सन २००९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये युती असताना भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अमरावती, तिवसा व मेळघाट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, बडनेरात युवा स्वाभिमान, दर्यापुरात शिवसेना, तर अचलपुरात प्रहारने बाजी मारली. २०१४ मधील मोदी लाट, जिल्ह्यात झालेली नरेंद्र मोदी यांची सभा, यामुळे युती नसतानाही अमरावती, मेळघाट व दर्यापूर मतदारसंघ भाजपने जिंकले, तर बडनेरा व अचलपूर अनुक्रमे रवि राणा व बच्चू कडू यांनी राखले होते. या निवडणुकीत सरासरी ३६ टक्के मतदान भाजपला झाले. आता ‘मोदी लाट’ ओसरली आहे. मात्र, विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदा अडसुळांच्या पथ्यावर आहे. २५० किमीच्या लोकसभा मतदारसंघात नव्याने मिळालेले अपक्षाचे चिन्ह पोहचविण्याची कसरत करावी लागणार असली तरी त्यासाठी त्यांनी चिन्ह प्रचाराची खास मोहिमच उघडली आहे.चित्र बदलेल का?सन २००९ लोकसभा निवडणुकींमध्ये महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मतदारसंघ आल्याने मित्र पक्ष असलेल्या आरपीआय (गवई) गटाला उमेदवारी देण्यात आली. या पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी अडीच लाखांवर मते घेतली. यामध्ये युतीचे आनंदराव अडसूळ विजयी झाले.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा या दाक्षिणात्य अभिनेत्री व युवा स्वाभिमानचे आमदार रवि राणा यांच्या सुविद्य पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यांनी ३ लाख २९ हजार मते घेतली. मात्र, रिपाइंचे राजेंद्र गवई यांनी उमेदवारी कायम ठेवून ५४,२७८ मते घेतली व बसपाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनाही ९९,२०० मते मिळालीत. या निवडणुकीत युतीचे आनंदराव अडसूळ विजयी झाले.यंदाच्या निवडणुकीत युतीचे आनंदराव अडसूळ हे कायम आहेत, तर मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन आहे. त्यांना अपक्षाचे चिन्ह मिळाले आहे. गुणवंत देवपारे हे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. अडसूळ वगळता परंपरागत विरोधकांचे पक्ष बदललेले आहेत.