शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मेळघाटात मतदानाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:51 IST

मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी १३३ गावांसाठी वनविभागाला साद

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: सोमवारी वैराट येथे जाऊन संपूर्ण माहिती घेतली. मतदानाच्या दिवशीची टक्केवारी मिळवण्यासाठी १३३ गावांमध्ये तात्पुरत्या उभारल्या जाणाऱ्या यंत्रणेचे त्यांच्यासमक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.चिखलदरा व धारणी तालुक्यातील संपर्कविहीन १३३ गावासाठींची संपर्क यंत्रणा कशी, हे जाणून घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित झोनल अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी ८ वाजताच संबंधित गावात पाठविण्यात आले. हे सर्व अधिकारी दिवसभर मेळघाटच्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये गेले. निवडणुकीदरम्यान करण्यात येणाऱ्या सर्वच प्रकारची माहिती त्यांनी गोळा केली. तेथून नजीकच्या वायरलेस केंद्रावरून चिखलदरालगतच्या वैराट येथील कंट्रोल रूमवर ती माहिती पाठविली. रायपूर, सेमाडोह, आत्रू चौराकुंड, हरिसाल, ढाकणा, डोलार, तारूबांदा, चिखली, आवागड या जवळपासच्या २० सबस्टेशनवरून वैराट कंट्रोल रूमकडे माहिती पाठविण्यात आली.

आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली स्थितीजवळपास १३३ गावांतील माहिती मिळणे कठीण असते. मतदान आटोपल्यावर ईव्हीएम येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सकाळी १० वाजता स्वत: वैराट येथे जाऊन प्रात्यक्षिक घेतले. त्यापूर्वी ८ वाजता परतवाडा येथील फातिमा कॉन्व्हेंटमधून निवडणूक पथके मेळघाटात पाठविली. ती पथके पोहोचली किंवा त्यांना काय अडचणी आल्यात, प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कुठल्या अडचणी उद्भवू शकतात, याचा धांडोळा घेतला.

मेळघाट नॉट रिचेबल, निवडणूक यंत्रणेची धावपळ, पहिल्यांदा वनविभागाची मदतमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलात वसलेल्या १३३ गावांमध्ये पहिल्यांदा निवडणुकीसाठी जवळपास २२ वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. वनविभागाची वाहने व अधिकारी निवडणूक कामात प्रत्यक्ष भाग घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात आदिवासींच्या सुख-दु:खाची प्रशासनाला माहिती पोहोचविण्यासाठी याच वायरलेस यंत्रणेचा उपयोग केला जातो.

ज्या ठिकाणी मोबाइलने संपर्क होऊ शकत नाही, मेळघाटातील अशा गावांमध्ये वनविभागाच्या वायरलेस यंत्रणेमार्फत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील माहिती घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी वैराट येथे प्रत्यक्ष पाहणी केली.- शैलेश नवालजिल्हाधिकारी, अमरावती

टॅग्स :amravati-pcअमरावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक