शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मेळघाटच्या दुर्गम भागात ८० जीपने पोहोचणार मतदान कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:35 IST

मेळघाटात सर्वाधिक ४० झोन राहणार आहेत. अतिदुर्गम भागात एसटी बस पोहोचत नसल्याने मतदान कर्मचाऱ्यांसाठी जीप व छोट्या वाहनांचा वापर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरी सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, प्रशासनाला विविध पर्यायांचा विचार करावा लागत आहे. मेळघाटात सर्वाधिक ४० झोन राहणार आहेत. अतिदुर्गम भागात एसटी बस पोहोचत नसल्याने मतदान कर्मचाऱ्यांसाठी जीप व छोट्या वाहनांचा वापर केला जाणार आहे. सुमारे ८० जीपच्या साहाय्याने मतदान कर्मचारी अधिकारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत धारणी, चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. मेळघाटात ३५५ मतदान केंदे्र आहेत. मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित केंद्रावर पोहचवून देण्यासाठी वाहतूक आराखडासुद्धा तयार करण्यात आला आहे. मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी आजही रस्त्याची वानवा आहे. परिणामी ९७ मतदान पथकांसाठी ४९ क्रूझर गाड्यांंची व्यवस्था करण्यात आली आहे. १९ क्रूझर आणि २१ टाटा सुमो आणि बोलेरो जीपमध्ये ४० झोनल अधिकारी व कर्मचारी असतील. मेळघाटचा दुर्गम भाग पाहता सर्वाधिक झोन ठेवण्यात आले आहेत. एका झोनवर ९ ते १२ मतदान केंद्रे राहणार आहेत. २० प्रवासी क्षमतेच्या पाच मिनीबस, १७ प्रवासी क्षमतेच्या दोन मिनीबससह २८ एसटी बस अशा वाहनातून मतदान पथके ३५५ मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा सूक्ष्म अभ्यासलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुर्गम भागात वेळेवर कुठलीही अडचण उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मेळघाट पालथा घातला आहे. जिल्ह्यात नवीन असल्याने ते स्वत: मेळघाट जाणून घेत आहेत. त्यानुसार त्यांनी मेळघाटातील मतदानकेंद्रांचा आराखडा तयार केला. जुन्या आराखड्यात व्यापक बदल केले. मतदान केंद्रापासून चिखलदरा व धारणी तालुका मुख्यालयाचे अंतर पाहता, पूर्वी पहाटे पाच वाजेपर्यंत मतदान पथके पोहोचत होती. आता मतदानाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :amravati-pcअमरावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक