लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील जरुड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपकडून गुजरीबाजार चौकात सभा घेण्यात आली. सभेमध्ये आ. अनिल बोंडे यांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने पिण्याच्या पाण्यासह शरद उपसा योजना व कर्जमाफीबाबत प्रश्न विचारताच भाजपाचे वक्ते भडकले. भाजपच्या मागणीवरून त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दडपशाहीमुळे जरुड ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे. ते लोकसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा आहे.सभा सुरू होताच अतुल देशमुख या तरुणाने आ. बोंडे यांना काही प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही. उलट सभा संपल्यानंतर पोलिसांनी अतुल देशमुख याला घरून पकडून नेले. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळला. शेकडो लोकांचा जमाव पोलीस चौकीत गेला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अतुल देशमुखविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार असल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दम ग्रामस्थांनी भरला आहे. सोपान ढोले या तरुणासही प्रश्न विचारण्यास मज्जाव करण्यात आला. प्रचारसभेला गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. व्देष भावनेतून जरुडातील एका नेत्याच्या घरातून त्या तरुणाला सभेत पाठवून गोंधळ घालण्याचा प्रकार झाला. उपस्थित नागरिकांनीच त्या युवकाला बाहेर काढलेजरूड येथील जाहीर सभेत एक तरुण गोंधळ घालत असल्याची माहिती आ. अनिल बोंडे यांनी मला दिली. त्यांच्या तक्रारीनुसार संबंधित तरुणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.- दीपक वानखडे,ठाणेदार, वरूड
Lok Sabha Election 2019; भाजपच्या सभेत प्रश्न विचारणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:10 IST
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील जरुड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपकडून गुजरीबाजार चौकात सभा घेण्यात आली. एका तरुणाने पिण्याच्या पाण्यासह शरद उपसा योजना व कर्जमाफीबाबत प्रश्न विचारताच भाजपाचे वक्ते भडकले.
Lok Sabha Election 2019; भाजपच्या सभेत प्रश्न विचारणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील जरूड येथील घटना