शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Lok Sabha Election 2019; ६३ टक्के महिला मतदार पन्नाशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:50 IST

यंदा लोकसभा निवडणुकीत ११ लाख ७९ हजार ८० महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदाराचा टक्का ४८.५२ आहे. यामध्ये ७ लाख ४० हजार ८७६ महिला मतदार या पन्नाशीच्या आतील आहेत.

ठळक मुद्दे४९ टक्का निर्णायक : पाच वर्षांत वाढले दीड लाख, मतदानात रुपांतरित होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा लोकसभा निवडणुकीत ११ लाख ७९ हजार ८० महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदाराचा टक्का ४८.५२ आहे. यामध्ये ७ लाख ४० हजार ८७६ महिला मतदार या पन्नाशीच्या आतील आहेत. एकूण महिला मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ६३ टक्के आहे व ही मतदारसंख्या प्रत्यक्षात मतदानात रूपांतरित होत असल्याने त्या निर्णायक ठरणार आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने बुधवारी जाहीर केलेली अंतिम मतदारसंख्या ही २४ लाख २९ हजार ७५४ आहे. यामध्ये १२ लाख ५० हजार ६३२ पुरुष, तर ११ लाख ७९ हजार ८० महिला मतदार मतदार आहेत. यापैकी मोर्शी व धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ हे वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने उर्वरित सहा विधानसभा म्हणजेच अमरावती लोकसभा मतदारसंघात आजची मतदारसंख्या १८ लाख ३० हजार ५६ आहे.महिला मतदारांचे प्रमाण वाढावे, किंबहुना हे मतदार मतदानामध्ये परिवर्तित व्हावे यासाठी सातत्याने ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे, महिला मतदार जागृतीसंदर्भात सध्या जिल्ह्यात धूमशान सुरू आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांची मतदारसंख्या १० लाख २० हजार ६९५ होती. सन २०१९ मध्ये ११ लाख ७९ हजार ८० एवढे महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदारसंख्येत १ लाख ५८ हजार ३८५ अशी वाढ झाली व पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानाचा टक्का ४८.५२ झाला आहे. विशेष म्हणजे, या मतदानात १८ ते १९ वर्षे वयोगटात १२ हजार ७१५, २० ते २९ वर्षे वयोगटात २ लाख ३ हजार १८, ३० ते ३९ वर्षे वयोगटात २ लाख ७२ हजार १६८, ४० ते ४९ वर्षे वयोगटात २ लाख ५२ हजार ९७५ असे एकूण पन्नाशीच्या आतील ७ लाख ४० हजार ८७६ महिला मतदार आहेत. हेच मतदान यंदा निर्णायक ठरणार आहे. याव्यतिरिक्त ५० ते ५९ वर्षे वयोगटात ३८८६८२ महिला मतदार, ६० ते ६९ वर्षे वयोगटात २४१५६४ महिला मतदार, ७० ते ७९ वर्षे वयोगटात १४३५०२ आणि ८० वर्षांच्या वर ९३९६० मतदार जिल्ह्यात आहेत.युवा आॅयकानचा फायदाक्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक करणारा धनुर्धर शुकमणी बाबरेकर व अपूर्वा शेंडे यांची युथ आॅयकान म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळेही युवा नोंदणीत फायदा झालेला आहे. याव्यतिरिक्त यंदा मतदारसंघात २७ ठिकाणी सखी मतदान केंद्रांचा प्रयोग राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर स्थानिक महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. रॅन्डमायझेशनमध्ये महिला कर्मचारी नाहीत तसेच पडदा मशीन सेंटरमध्येदेखील स्थानिक महिला कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे, निवडणूक ड्युटी नको म्हणून महिला कर्मचाऱ्यांचे अत्यंत कमी अर्ज आलेले आहेत.असे आहेत नवमतदारयंदा ३१ हजार ४३१ युवा मतदारांची (१८ ते १९ वर्षे वयोगट) नोंदणी झालेली आहे. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात १४१८, अमरावती १९८३, धामणगाव रेल्वे २०३७, तिवसा १४९७, दर्यापूर १६१३, मेळघाट १३२५, मोर्शी १३९४ व अचलपूर मतदारसंघात १४४८ महिला नवमतदार आहेत.जिल्ह्यात २० ते २९ वयोगटातील ४ लाख ३९ हजार ९४७ मतदार आहेत. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात २५५१२, अमरावती २९६१२, धामणगाव रेल्वे २५६३२, तिवसा २२७२१, दर्यापूर २४७४७, मेळघाट २७४१०, मोर्शी २३८१२ व अचलपूर मतदारसंघात २३४५२ महिला मतदार आहेत.तिशीत २.७२ लाख मतदारजिल्ह्यात ३० ते ३९ वर्षे वयोगटात ५४४०९२ महिला मतदार आहेत. यामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघात ३४७७८, बडनेरा ४२०३१, अमरावती ४००५१, तिवसा ३२३३५, दर्यापूर ३११६४, मेळघाट ३०६७७, अचलपूर २९९०५ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ३१२२८ मतदार आहेत.जिल्ह्यात ४० ते ४९ वर्षे वयोगटात ५२३४४२ महिला मतदार आहेत. यामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघात ६९१४१, बडनेरा ८२९२२, अमरावती ७५३९६, तिवसा ६३६००, दर्यापूर ६१५१९, मेळघाट ५४५८५, अचलपूर ५५७३३ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ६०५४६ मतदार आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती