शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीने झळाळणार स्थानिक स्वराज्य संस्था

By admin | Updated: December 6, 2015 00:02 IST

वीज बचतीसाठी एलईडी बल्ब चा प्राधान्याने वापर करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका, पालिका आणि नगरपंचायत प्रमुखांना दिले आहेत.

अमरावती महापालिकेकडून हिरवी झेंडी : वीज बचतीसाठी उपाययोजनाप्रदीप भाकरे अमरावतीवीज बचतीसाठी एलईडी बल्ब चा प्राधान्याने वापर करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका, पालिका आणि नगरपंचायत प्रमुखांना दिले आहेत. विधानमंडळाच्या सन २०१५ च्या पहिल्या अधिवेशनात आ. अमित सारम यांनी हा प्रश्न मांडला होता. शहरातील पथदिव्यांच्या कमी प्रकाशामुळे मुलींची छेडछाड, विनयभंग, तसेच खून, बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची लक्षवेधी चर्चा या अधिवेशनादरम्यान करण्यात आली होती. चर्चेदरम्यान या घटनांवर अंकुश लावण्यासाठी एलईडीच्या वापरासंदर्भात सूचना करण्यात आल्यात. एलईडीचा वापर केल्याने विजेची व पर्यायाने पैशाची बचत होते. इतर साधनांपेक्षा अधिक प्रकाश मिळतो. त्या आधारे राज्य सरकारच्या नगरविकास आणि ऊर्जा विभागामार्फत मुंबईच नव्हे, तर सर्व महापालिकांना एलईडी बल्ब लावण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन सभागृहात देण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य द्यावे, व त्यामधून एनर्जी सेव्हिंग करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे आगामी काळात महापालिका, पालिका आणि नगरपंचातीतील क्षेत्र एलईडी बल्बच्या प्रकाशात झळाळून निघण्याचे सुखद चित्र आहे. नागरिकांसाठी एलईडी बल्बघरगुती वीज ग्राहकांना सात वॅटचे एलईडी बल्ब सवलतीच्या दरात महावितरणाकडून देण्यात येत आहे. बाजारात साधारणपणे ३० रुपयांचा एलईडी बल्ब घरगुती वीज ग्राहकांना प्रत्येकी १०० रुपयांमध्ये दिला जात आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील ३० केंद्रावरून ३ डिसेंबरपर्यंत ३.५० लाख बल्बची विक्री झाली. राज्य शासन, एनर्जी इफिसिएंशी सर्व्हिसेस लिमिटेड आणि एसपीएएन यांच्यावतीने ही योजना सुरू आहे. एलईडी बल्बमुळे तब्बल ८० टक्के वीज बचत होत असल्याचा दावा महावितराणाकडून केला जात आहे.अमरावती महापालिकेत ‘एलईडी’ला मंजुरीमहापालिका क्षेत्रात एलईडी बल्ब लावण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. पुणे येथील सायंन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क या कंपनीने अमरावतीसह याचा सर्वे केला असून सर्व्हेनंतर शहरक्षेत्रात एलईडी लब्ब लावले जाणार आहेत. याबाबत गुरुवारच्या आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.