शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत साप घरात सोडून पैसे उकळण्याचा धंदा

By admin | Updated: April 20, 2015 00:26 IST

जिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे.

दोघांवर कारवाई : नागरिकांमध्ये भीतीचे वातारण, वनविभागाने घेतली दखलरोहित प्रसाद तिवारी मोर्शीजिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा खेळ करणाऱ्या दोघांवर रविवारी कारवाई केली आहे. बाहेरगावची काही मंडळी जिवंत साप टोपलीत ठेवून लोकांच्या घरी, दुकानात पोहोचत असत. टोपलीतील साप हातात धरुन ते लोकांकडून पैशाची, अन्नधान्याची मागणी करीत होते. त्यांना पैसे, अन्नधान्य दिले नाही तर ते साप दुकानात, घरात सोडून देत असत. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भीतीपोटी नागरिकांनी संबंधितांना पैसे व धान्य देण्याचा प्रकार येथे वाढला आहे. त्यामुळे या लोकांचा धंदा जोरात सुरु होता. काही जागरुक नागरिकांनी सर्पमित्रांना, पोलिसांना बोलाविण्याची धमकी दिल्यावर ही मंडळी तेथून पोबारा करीत असत; तथापि त्यांचा हा भीतीयुक्त धंदा सुरुच होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये, दुकानदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती.शनिवार १८ एप्रिल रोजी अशाचप्रकारे ही मंडळी जयस्तंभ चौकात दहशत निर्माण करुन धंदा करीत असताना एका नागरिकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन हा प्रकार बंद पाडण्याची विनंती केली. मोर्शीचे वर्तुळ अधिकारी राजेंद्र राऊत, विशेष वर्तुळ अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एस. व्ही. डहाके आणि वनमजूर मनोहर वणवे यांनी दूरभाष केंद्र परिसरात दोघांना त्यांच्याकडे असलेल्या साप, आणि टोपलीसह पकडले; तथापि वन कार्यालयात या आरोपींना आणत असताना त्यांनी पोबारा केला. वन विभागाच्या कार्यालयात सापासह टोपली आणून जप्त करण्यात आली. येथील सर्पमित्र असलम शहा यांना बोलावून पकडलेल्या सापाची शहानिशा करण्यात आली. ‘दिवड’ नावाचा हा पाण्यात राहणारा बिनविषारी साप असल्याचे त्याने हाता-पायाला चावा घेतल्यास तो सोडत नसल्याचे आणि ओढून काढल्यास खोलवर जखम होत असल्याची माहिती असलम शहा यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. हा साप अप्पर वर्धा धरण परिसरातील पाण्यात सोडण्यात येणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. साप पकडून त्याचा खेळ मांडण्याचा प्रकार हा वन वन्य जीव संरक्षण अधिनियम खाली गुन्हा ठरतो. मात्र वृत्त लिहिस्तोवर कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.