शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुसाईड स्पॉट’ विहिरींची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:44 IST

सार्वजनिक ठिकाणी व नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले.

ठळक मुद्देमालकास नोटीस बजावणार : विहिरीवर जाळी बसविण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक ठिकाणी व नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले. शीतल पाटील यांची हत्या करून त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरीत फेकण्यात आला होता. रविवारी त्याच विहिरीत आणखी एका इसमाने आत्महत्या केली. या घटनांच्या अनुंषगाने ही विहीर सुसाइड स्पॉट बनल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.शीतल पाटील हत्याकांडानंतर शेतमालकास नोटीस बजावून विहिरीवर जाळी बसविण्यासाठी किंवा बुजविण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, शेतमालकाने त्याची दखल घेतली नाही. विहिरीजवळच अनेकदा प्रेमीयुगुल आढळले असून, काही वर्षांपूर्वी त्याच परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याच विहिरीत यापूर्वी तीन ते चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या. विहिरीजवळील एका खोलीत आढळलेल्या आक्षेपार्ह साहित्यावरून त्याठिकाणी देह विक्रीचा व्यवसायसुद्धा चालत असल्याची चर्चा आहे. मोकळ्या जागेत ही विहीर असल्याने कुणीही रागाच्या भरात आत्महत्येसाठी हाच स्पॉट निवडत आहेत. अशाप्रकारच्या अप्रिय घटना घडल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सोमवारी सर्व ठाण्यांना सूचना देऊन त्यांच्या हद्दीतील सार्वजनिक विहिरी, वापरात नसलेल्या विहिरी व निर्जनस्थळावरील विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे.सार्वजनिक, निर्जनस्थळावरील विहिरींची यादी बनविण्याचे निर्देश ठाणेदारांना दिले आहे. या विहिरी धोकादायक ठरत असल्यामुळे त्यावर जाळ्या बसवाव्यात किंवा त्या बुजवून टाकाव्यात, याबाबत संबंधित विहीरमालकास नोटीस बजावण्यात येईल.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त