शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘स्ट्रॉबेरी’ने उंचावले शेतकऱ्यांचे जीवनमान

By admin | Updated: March 5, 2016 00:15 IST

मेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला.

मेळघाटात हरितक्रांती : ५०० लोकांना मिळाला रोजगार, रोज लाखोंची उलाढालमनीष कहाते अमरावतीमेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला. रोज लाखो रूपयांची उलाढाल याद्वारे होत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चिखलदऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे. येथील शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने मेळघाटमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामध्ये ५० शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास इच्छुक झाले. चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील सर्वाधिक ३४ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. तेथील शंकर किसन निखाडे यांनी स्ट्रॉबेरीची लागवड आॅक्टोबर २०१५ मध्ये १० गुंठे शेतामध्ये केली. स्ट्रॉबेरी लागवडीआधी ते कोरडवाहू पिके घेत होते. त्यामध्ये त्यांना कधी १५ हजार रुपयांच्यावर उत्पन्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिन्यांच्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीने आम्हाला लाखो रूपये कसे दिसतात ते पहायला मिळाले. आजपर्यंत ७० हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली असून महिनाभरात तेवढीच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलाडोह, शहापूर, टेटू, आमझरी, खटकाली, सलोना, लोणादरा आदी ठिकाणी शेतात स्ट्रॉबेरीची लागवड झाली. आलाडोह येथील नारायण खडके यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आतापर्यंत एक लाख रुपयांची स्ट्रॉबेरी विकल्याचे त्यांनी सांगितले. चिखलदरा शहरात व आजूबाजूच्या गावांत स्ट्रॉबेरी स्टॉल विक्रीकरिता तेथील लोकांनी लावले. त्यामध्ये सुमारे ५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातच वजनकाटे लावून स्ट्रॉबेरीची विक्री सुरू केली आहे. रोजचा खर्च शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीवर भागत असल्याचे गणेश शेळके स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी अमरावती, परतवाडा, इंदौर, नागपूर, हैद्राबाद, मुंबई येथे विक्रीला नेल्याचे पान्डू शनवारे यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी कधी पाहली नाही. गहू, सोयाबीन, तूर, कापूस हेच आमचे कोरडवाहू पिके. परंतु यामधून खर्चाच्या मानाने उत्पन्न अतिशय कमी मिळत होते. परंतु उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चमूने आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार कायमचा दूर केल्याचे साधुराम पाटील यांनी सांगितले.