शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:05 IST

आदिवासी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये मागे राहू नये, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे दिले जात आहे.

ठळक मुद्देचिखलदऱ्यात निवासी प्रशिक्षण : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : आदिवासी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये मागे राहू नये, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे दिले जात आहे. त्याकरिता चिखलदरा येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.न्युक्लीयस बजेट (केंद्रवर्ती योजनेंतर्गत) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने धारणी व चिखलदरा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण २४० खेळाडू मुले, मुलींना खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी खेळ या चार प्रकारातील खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चिखलदरा येथील श्री गिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. शिबिराचे उद्घाटन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे.क्रीडा प्रशिक्षणाचे उद्घाटन धारणी प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक पीयूष जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, चिखलदरा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संदीप बोळखे, प्राचार्य अतुल निंभेकर, अतुल पाटील आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणार्थी खेळाडूंना कबड्डी खेळासाठी अजय पुसदकर, भूषण भोसले, खो-खो अतुल निंभेकर, तुकेश सपकाळ, व्हॉलीबॉलसाठी राहुल शर्मा, हेमंत जोशी व मैदानी खेळ (अ‍ॅथलेटीक्स) अतुल पाटील, अक्षय येकुणकर, सुजित सरडे या तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.कार्यक्रमाचे संचालन व आभार बी.एस. महानकर यांनी केले. तर प्रशिक्षण शिबिराचे संयोजन अनिल बोरवार हे पाहत आहेत.