डोमा आश्रम शाळेतील प्रकारनरेंद्र जावरे - चिखलदरातालुक्यातील डोमा शासकीय शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भातात अळ्या, जळलेली पोळी, पिण्याच्या पाण्यात बेडूक, उघड्यावर अर्धपोट जेवण अन् फाटलेले ब्लँकेट अशा अनेक समस्यांनी सातशेपेक्षा अधीक मुला-मुलींना वेठीस धरले असल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांची बकाल अवस्था आहे. सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सत्य डोमा येथील आश्रम शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग असून सातशेच्या जवळपास आदिवासी मुल-मुली निवासी आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे मुलांना सकाळी १०.३० वाजता जेवण देण्यात आले. जेवणात वांग्याची भाजी, दाळ, भात, जळालेली पोळी नेहमीप्रमाणे होती. वांग्याच्या भाजीत अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आश्रम शाळेला होणारा धान्य व भाजीपाल निकृष्ट व सडक्या दर्जाचा असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात लखन मुंगीलाल तोटे, देवीदास राजाराम बेठेकर, दिलीप मुन्ना कास्देकर, अंकुश रामोधिकार, रामूू धिकार, गजानन बेठेकर, लक्ष्मण कास्देकर, शारदा दहिकर, भागू सावलकर, महिमा मावस्कर यांनी तक्रार केली आहे.अर्धपोटी जेवणआश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जाण्यासोबत एक पोळी व वरण, भात असे अर्धपोटे जेवण दिल्या जात असल्याच्या कारणावरुन गत महिन्यात या विद्यार्थ्यांनी पायदळ धारणी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे कुच केली होती. सदर प्रकार माहिती होताच विद्यार्थ्यांना सेमाडोह येथे थांबवून प्रकल्प कार्यालयातर्फे त्यांची समजूत काढून आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.अंधाराचे साम्राज्यसातशेच्या जवळपास पहिली ते बारावी पर्यंतचे मुल-मुली निवासी असताना एका खोलीत दीडशेवर विद्यार्थी झोपतात. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्यांना नेहमी अंधारातच रात्र काढावी लागते. जनरेटर, सौर उर्जेचे दिवे काही बेपत्ता वजा बंद अवस्थेत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अंधारात सर्प, विंचू पासून भिती असताना त्यावर दुर्लक्ष करण्यात आले. जारीदा आश्रम शाळेतील अस्वलाचा हमला विद्युत पुरवठा बंद असल्यामुळेच झाला होता हे विशेष.
भातात अळ्या, पाण्यात बेडूक, करपलेली पोळी!
By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST