शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी वसुलीत खोडा

By admin | Updated: January 31, 2015 01:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने येत्या १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) ऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली महापालिकांत सुरु होणार,..

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने येत्या १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) ऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली महापालिकांत सुरु होणार, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे एलबीटी जाणार हे आता निश्चित झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा थांबविला आहे. दुसरीकडे एलबीटी कसे वसूल करावे, हा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात एलबीटीचे उत्पन्न ३ कोटी ६४ लाख रुपये वसूल झाल्याची माहिती आहे.महापालिकेचा आर्थिक डोलारा हा एलबीटीवर अवलंबून असताना काही महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी एलबीटीला कडाडून विरोध केला. एलबीटी हटविण्याची मागणी करीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारादेखील व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र काँग्रेस शासन एलबीटीच्या निर्णयावर कायम राहिले तर भाजपचे शासन आल्यास एलबीटी हटवू, असे ठोस आश्वासन दिले होते. त्यानुसार भाजपने सत्तास्थानी आल्यानंतर राज्यातून एलबीटी हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. नवीन कर प्रणाली लागू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असताना शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी एलबीटीचा भरणा बंद केला आहे. परिणामी दरमहा साडेसहा कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट असताना केवळ हे चार कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. याचा मोठा भार महापालिका तिजोरीवर पडला आहे. महापालिका आर्थिक संकटातून वाटचाल करीत असताना एलबीटीचे उत्पन्न माघारल्याने आयुक्त हैराण झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, कंत्राटदार व पुरवठादारांची देणी कशी अदा करावी, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. मागील डिसेंबर महिन्यात ५ कोटी ७१ लाख रुपयांचे उत्पन्न एलबीटीतून मिळाले होते, हे विशेष. (प्रतिनिधी )