शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कायदा रुग्णसेवेपेक्षा मोठा नाही

By admin | Updated: October 8, 2016 00:19 IST

रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात,..

बच्चू कडू : उपजिल्हा रुग्णालयात स्पंदन मेळावापरतवाडा : रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात, याचा प्रत्यय अनेकांना आपापल्या जीवनात येतो. आपण आतापर्यंत जवळपास ६५ हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्यात. त्यासाठी पहिल्यांदा विना तिकीट मुंबई प्रवास करावा लागला, मानवतेसाठी कायदा तोडून रुग्णसेवेचे कार्य करावे लागले, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित स्पंदन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर, पं.स.सभापती गजानन भोरे, विकास अधिकारी सावरकर, पी.वा. शहाणे, हर्षवर्धन हरले, अंकुश जवंजाळ, सा.बां. विभागाचे अभियंता प्रमोद भिलपवार, गोपाल बकालेंसह मान्यवर उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी बालकांचा स्पंदन मेळावा ४ आॅक्टोबर रोजी झाला. तालुक्यातील सर्वच शाळेतील ६७ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यासाठी पालकांना कुठलाच खर्च करावा लागत नाही. त्या विद्याथर्यांच्या पुढील भविष्यासाठी या स्पंदन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शून्य खर्चातून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियांमध्ये तालुक्यातील सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)हिवाळी अधिवेशनात मुदतवाढराष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्रशासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना संपत आल्या आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण त्या योजनांची मुदतवाढ करण्यासाठी मागणी करणार असल्याचेसुद्धा आ. बच्चू कडू यांनी उपसचिवांना सांगितले. कुष्ठरोगी हृदयरुग्णांना औषधी शासनाच्या ढीगभर योजना आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचविल्याच जात नाहीत. योजना कागदावर तयार होऊन तेथेच थांबविण्याचे सत्य आहे, तर काही योजना तयारच का केल्या आणि त्यांचा लाभ तरी कुणाला मिळणार, असा संतापजनक प्रश्न निर्माण होत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगीत कुष्ठरोग व हृदयरोग रुग्णांना लवकरच सहाशे रुपये प्रतिमहिना औषधी खर्च लागू करून देऊ. शासन निर्णय फार अडगळीचा आहे. १८ वर्षांवरील रुग्ण व बापलेक कमावते नको असा तो निर्णय राज्यात फक्त अचलपूर तालुक्यात मानवतेचा दृष्टिकोन पुढे ठेवून आपण शिथिल केल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.६५ हजार मोफत शस्त्रक्रिया१९९९ पासून आपण रुग्णांना अविरतपणे मुंबई येथील जे.जे., अंबानी. हिंदुजासारख्या अत्यंत महागड्या दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी नेले. आजपर्यंत किमान ६५ हजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. किमान २ लक्ष रुपयांच्या वर खर्च संबंधित रुग्णांसाठी करावा लागला तर त्यांच्याच बेलोरा गावातील जामोदकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २१ लक्ष रुपये खर्च करण्यात आला होता. ती शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात आली होती. पहिल्यांदा विनातिकिट प्रवास करून शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव आयोजित मेळाव्यात आ.बच्चू कडू यांनी उपस्थितांसमोर कथन केला.