शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील शेवटच्या माणसाचा विचार व्हावा

By admin | Updated: April 20, 2015 00:24 IST

समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. ..

चर्मकार समाजाचा मेळावा : पालकमंत्र्यांचे प्रतिपादनअमरावती : समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ गरजवंतापर्यंत पोहोचवून अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविदास विश्वभारती प्रतिष्ठान व रविकिरण वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री बोलत होते. माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी खा. आनंदराव अडसूळ होते. आ.सुनिल देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदीले, आ.रामंचद्र अवसरे संयोजक राजीव जामठे, सुदाम वानरे आदी व्यासपीठावर होते. समाजामुळेच आपण मोठ्या पदावर आहोत याचा अधिकाऱ्यांना विसर पडू देऊ नये. समाज मंदिर हे चांगले संस्कार घडविण्यासाठी असतात, अशा समाज मंदिरातून समाज घडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्र्यांनी या समाज मंदिरासाठी एक एकर जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. सामूहिक विवाह मेळाव्यामुळे समाजाचा प्रभाव वाढतो, असे प्रतिपादन उद्घाटक बबनराव घोलप यांनी केले. मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देऊन मदत केली पाहिजे. मी स्वत: अशी १२ मुलं दत्तक घेतली असून त्यांना आयएएस, आयपीएस बनविणार असल्याचा मानस घोलप यांनी व्यक्त केला. खा. आनंदराव अडसूळ अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले, समाजाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित आणून समाज विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. सामाजिक संघटन मजबूत असले तर सर्व समस्या सुटू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष आ. रमेश बुंदिले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संयोजक राजीव जामठे यांनी मेळव्या मागील पार्श्वभूमि स्पष्ट केली. या मेळाव्यास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.