शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

१,९६३ गावांची अंतिम ७० पैसेवारी

By admin | Updated: January 1, 2017 00:46 IST

पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला

उरफाटा न्याय : सोयाबीन, मुगाचे मोठे नुकसान अमरावती : पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीयोग्य एक हजार ९६३ गावात ७० पेसेवारी जिल्हा प्रशासनाने काढली. यंदाच्या हंगामात प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकताच झाल्याच्या पार्श्वभूमिवर ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीने शासन खूष असले, तरी शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक असा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७८ मिमी पाऊस पडला.सुरूवातीला काळात अधिक पावसाने अल्प कालावधीचे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काळ्या जमिनीच्या शेतामधील तुरीवर ‘मर’ रोग येऊन हजारो एकरातील पीक नष्ट झाले आहे. तर ७ आॅगस्टनंतर महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आली. सोयाबीन सोंगणी व मळणीच्या हंगामात सतत पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्यांचे अंकुरण झाले. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिपावसामुळे कपाशीची पातेगळ व प्रतिकुल स्थितीमुळे ‘लाल्याचा’ प्रादुर्भाव झाला. डिसेंबरच्या अखेरच्या दोन आठवड्यात अति थंडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील उभी तूर जळाली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात कमी येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीपाची अंतिम ७० पैसेवारी जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळण्यास अडसर निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)