शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्यासह जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

तिवसा : जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकाम आदी विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाद्वारे मोठी तरतूद करण्यात आली आहे. ...

तिवसा : जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकाम आदी विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाद्वारे मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ३३ कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक रस्ते व पुलाची कामे मार्गी लागून विकास गतिमान होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व तसे निवेदनही दिले. त्यानुसार शासनाकडून अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेतील. खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेची कामे याद्वारे होणार आहेत. रस्त्यांवरील आवश्यक पुलांचेही काम सुरू होणार आहे. यामुळे प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण होणार आहे. अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सुविधा निर्माण होईल. राज्याच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.

अशी आहे तरतूद

राज्य महामार्ग ३०३ बेलोरा काटसूर आडगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी १ कोटी २० लक्ष, पूर्णानगर निरूळ गंगामाई वाकी खोलापूर रस्त्यावर सुधारणा व पुलासाठी ३ कोटी, अडगाव यावली पिंपळविहीर मार्डी कारला ते चांदूर रेल्वे या राज्य महामार्ग ३०३ च्या सुधारणेसाठी दीड कोटी, अडगाव यावलीमार्गे माऊली जहाँगीर रस्त्यासाठी ९० लक्ष, यावली डवरगाव मोझरी व-हा रस्त्याच्या सुधारणेसाठी साडेचार कोटी, मार्डी- कार्ला- चांदूर रेल्वे राज्य महामार्गच्या सुधारणेसाठी ४ कोटी, तळवेल साऊर, तरारखेडा, आष्टी, वायगाव खारतळेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विर्शी वायगाव रस्ता सुधारणा व छोट्या पुलासाठी २ कोटी, रिद्धपूर- बेलोरा- चिंचोली काळे देवरी- कठोरा- नांदगावपेठ रस्त्याच्या सुधारणा व पुलासाठी ४ कोटी, तरारखेडा पुसदा रोहणखेडा माऊली जहाँगीर रस्ता सुधारणा व पुलासाठी ३ कोटी, उदखेड खोपडा शिरखेड रस्ता सुधारणेसाठी ३ कोटी ७० लाख, बहिरम सरफापूर फाटा चांदूर बाजार बेलोरा यावली चांदूर रेल्वे रस्त्यावर सुधारणा व लहान पुलासाठी १ कोटी ७१ लाख, नेरपिंगळाई आखतवाडा वाठोडा रस्ता सुधारणा व लहान पुलासाठी १ कोटी ९० रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.