शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

भूमिहीन शेतकरी पुत्रांना मिळेनात वधू!

By admin | Updated: May 6, 2016 00:15 IST

शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते.

कर्मचाऱ्यांना प्राधान्य : शेती व्यवसाय बेभरवशाचा परिणामसुनील देशपांडे अचलपूर शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण कमी असल्याने व स्थावर मालमत्ता नसल्याने बहुतांश समाजातील युवक मुली बघण्याकरिता फिरताना दिसतात. परंतु मुलींची बहुतांश समाजामध्ये कमतरता असल्याने भूमिहीम मुलांना प्रत्येक समाजात मुली देण्यासाठी नकार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या मुलीला चांगला पती मिळण्याकरिता शेती, स्थावर मालमत्ता किंवा कंपनीमध्ये काम करीत असेल तरच मुलीला दाखवितात. नाही तर मुली दाखविण्यासच तयार होत नसल्याचे शेतकरी मजूर तरुणांच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. काही छोट्या समाजामध्ये मुलीचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे व पैशाने लबालब असल्याने त्यांना कोणत्याही समाजाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारणे वावगे वाटत नाही. काही सुशिक्षित समाजातील तरुण तर बहुतांश वृत्तपत्रांत मुलगी पाहिजे म्हणून जाहिरात देतात व त्या जाहिरातीत मी स्वत: ३० हजार रुपये महिना कमावत असून मी कोणत्याही समाजाची मुलगी करायला तयार आहे करिता संपर्क साधावा, अशा प्रकारच्या जाहिराती देऊन मुली शोधत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीमुळे तालुक्यातील तरुणांची मानसिकता खराब होत चालली आहे. त्या मानसिकतेमध्ये बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहेत. यापेक्षाही उलट म्हणजे मुलीचे आई-वडील दारू पिणाऱ्या शासकीय नोकरी करणाऱ्या मुलांना डोळे बंद करून मुली देण्यास तयार होतात. मात्र राबराब कष्ट राबणाऱ्या तरुणांकडून शेतीचे कामे करून घेतात. मात्र मुलगी देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र नकार देतात. यामुळे तालुक्यातील भूमिहीन मजूर वर्गातील मुलांचे आई-वडील हतबल झाले असून मुलासाठी मुलगी शोधावी तरी कशी, असा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने भूमिहीन शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देऊन काही प्रमाणात भूमिहीन तरुणांपुढील संकट दूर करावे. तसेच शासकीय बँकांमार्फत भूमिहीन शेतकऱ्यांना सुलभ स्वरुपात कोणतीही अट न ठेवता उद्योगधंद्यासाठी कर्ज देण्यात यावे, अशा प्रकारची इच्छा तालुक्यातील भूमिहीन तरुणांनी बोलून दाखवली. दारू पिणारा चालेल, पण सातबारा असावातालुक्यामध्ये भूमिहीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी काही तरुणांनी स्वकष्टाच्या जोरावर प्रगतीसुद्धा केली आहे. तरीसुद्धा प्रत्येक समाजामध्ये भूमिहीन तरुणांना मुली देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. दारू पिणारा मुलगा असला तरी चालेल. पण त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता किंवा शासकीय-निमशासकीय नोकरी असायला हवी. अशांनाच प्रत्येक समाजामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते, असे परतवाडा येथील पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले.कोणत्याही समाजाचा असो त्या प्रत्येक समाजाच्या मुलींच्या आई-वडिलांना आपल्या मुलीला योग्य वर मिळावा, अशी अपेक्षा असते. त्याकरिता ते प्रथम प्राधान्य शासकीय-निमशासकीय नोकरी करणाऱ्या तरुणांना देतात. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे. परंतु प्रत्येक समाजामध्ये असेही काही आई-वडील आहेत की भूमिहीन कष्टकरी मुलांनासुद्धा प्राधान्य देतात.- शुभम गायकवाड, धामणगाव गढीसमाजामध्ये असलेले मुलींचे कमी प्रमाण यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे. प्रत्येक आई-वडीलाची इच्छा असतेकी, आपल्या मुलीचे जीवन सुखात जावे याकरिता ते आर्थिक स्थितीने सुदृढ असणाऱ्या मुलांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे भूमिहीन तरुणांना मुली मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकावे लागते. परंतु या सर्व कारणामुळे तरुण मुलांची मानसिकता बिघडत चालली आहे.- विवेक काळे, धामनगाव गढी