शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात

By admin | Updated: February 28, 2016 00:40 IST

स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे.

पुरवठा विभागाचे आदेश : १ एप्रिलपासून अंमलबजावणी अमरावती : स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. ज्या ग्राहकांकडे गॅसची जोडणी नाही त्या ग्राहकांना सराकरी स्वस्त धान्य दुकानातून रॉकेलचा पुरवठा केला जातो. केंद्र शासन ४० ते ४५ रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन खरेदी करून ग्राहकांना १५ ते १७ रुपये प्रति लिटर दराने पुरवठा करते. फरकाची २२ ते २३ रुपये ही सबसिडीची रक्कम आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकार ही रक्कम खर्च स्वत: खर्च ग्राहकांना स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध करते. खरेदी केली. रॉकेल हे काळ्या बाजारात विकले जात असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होते. गरीबांना स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध करण्याचा हेतू साध्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांना सबसिडीच्या दरात रॉकेल उपलब्ध न करता शिधा दुकानातून बाजारभावाने रॉकेलची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध नसणाऱ्या कुटुंबाला रॉकेल उपलब्ध केले जाते. केंद्राकडून त्यासाठी राज्य शासनाला दर महिन्याला ५० हजार लिटर रॉकेल केला जात आहे. केंद्र सरकारच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर अमरावती आणि नागपूरमध्ये तर राज्य सरकारच्यावतीने लातुर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार व नांदेडमधील शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे. १ एप्रिलपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १८,४२ दुकानातून ३ लाख ८४ हजार ४२२ ग्राहकांना विना सबसिडी रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)२३ रुपये प्रतिलिटर सबसिडी होणार जमाशिधापत्रिकेत नोंद असलेल्या एका व्यक्तीला ३ व ३ पेक्षा अधिक व्यक्तींकरिता ४ लिटर रॉकेल दिल्या जाते. शिधापत्रिकेत रॉकेल खरेदीची नोंद केल्यावर सदर ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडीचे २३ रुपये प्रतिलिटर (त्या दिवशीच्या दरानुसार सबसिडी देय) जमा करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.