शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:59 IST

आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक जलसिंचनाची साधने वाढवावी लागतील तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : चांदूर रेल्वेत अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक जलसिंचनाची साधने वाढवावी लागतील तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले.उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्देशाने चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर हे तीन तालुके मिळून स्थानिक संताबाई यादव सभागृहामध्ये खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या अध्यक्षस्थानाहून आ. जगताप यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सी.यू. पाटील, निवृत्त शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे होते. तज्ज्ञ शेतकरी मार्गदर्शक म्हणून सुधीर जगताप, नांदसावंगी येथील प्रगतिशील शेतकरी अनिल सरोदे उपस्थित होते. सर्वप्रथम कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे यांनी केले.सोयाबीन पिकाच्या नवीन जाती, जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रिया पद्धती, पी.एस.बी. रायझोबियमचे महत्त्व, सुधारित पेरणी पद्धती तसेच सेंद्रिय खताचे उत्पादनवाढीमध्ये महत्त्व याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कपाशीबाबत राजेंद्र जाणे यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी धामणगाव रेल्वेचे अजय तळेगावकर, चांदूर रेल्वे व्ही.सी. केवे, नांदगाव खंडेश्वर अरुण गजभिये परीक्षित मालखेडे यांनी परिश्रम घेतले.