शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांच्या मानसकन्येचे खासदारांकडून कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:29 IST

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.

ठळक मुद्देमूकबधिर वैशालीचे शुभमंगल : हव्याप्र मंडळात होणार विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.सन १९९५ मध्ये वैशाली अचलपूर तालुक्यातील वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात दाखल झाली. या बालगृहाची जबाबदारी शंकरबाबा पापळकर यांनी स्वीकारली आहे. मुंबईच्या चेंबूर भागात वैशालीला तिच्या अज्ञात माता-पित्याने कचºयाच्या ढिगावर टाकून पलायन केले. पोलिसांनी तिला उचलून डोंगरी येथील रिमांड होममध्ये दाखल केले. दोन वर्षांपर्यंत तिच्या माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये तिला शंकरबाबा पापळकर यांच्या स्वाधीन केले. तिचे वैशाली असे नामकरण करण्यात आले. मूकबधिर असलेली ही वैशाली आता २५ वर्षांची झाली असून, तिचा विवाह संस्थेतच मोठा झालेला मूकबधिर अनिलसोबत जुळविला आहे.१४ जानेवारीला लग्नवैशाली व अनिल यांचे लग्न १४ जानेवारी २०१९ रोजी नियोजित केले आहे. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात थाटात हा सोहळा पार पडेल, असे वचनच खा. अडसूळ यांनी शंकरबाबांना दिले. आतापर्यंत त्यांच्या संस्थेतील मुलींचे विवाह थाटात पार पडले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.आजपासून ही माझी मानसकन्याकन्यादानाचे दायित्व पार पाडावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली असता, त्यांनी त्यास होकार दर्शविला आणि आजपासून ही माझी मानसकन्या झाली, असे सांगितले. या घडामोडीबद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी समाधान व्यक्त केले.पुनर्वसनाची काळजी झाली दूरवैशाली वयात आल्यानंतर तिच्या पुनर्वसनाची काळजी शंकरबाबांना लागली होती. सुदैवाने संस्थेतच लहानाचा मोठा झालेला अनिल याचे वैशालीसोबत सूर जुळले आणि दोघांनी लग्नगाठीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अनिलला पुणे येथून शंकरबाबांच्या स्वाधीन करण्यात आले होते.