शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात होणार केळी संशोधन केंद्र

By admin | Updated: August 12, 2014 23:30 IST

विभागात संत्रा पिकांबरोबर केळी पिकात होणारी वाढ लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अचलपुर येथे केळी संशोधन केंद्रासाठी प्रस्ताव दिला आहे. राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या

जितेंद्र दखणे - अमरावतीविभागात संत्रा पिकांबरोबर केळी पिकात होणारी वाढ लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अचलपुर येथे केळी संशोधन केंद्रासाठी प्रस्ताव दिला आहे. राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. विदर्भातील प्रमुख फळपिकांमध्ये संत्र्याचा समावेश होता. पश्चिम विदर्भातील अमरावती आणि पूर्व विदर्भातील नागपुर परिसरात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र संत्र्याखाली आहे. नागपुरची ओळख‘आॅरेंज सिटी’ असली तरी सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र मात्र अमरावती जिल्ह्यात आहे. या भागात ७५ हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. संत्र्यानंतर परिसरात केळी लागवडी देखील वाढत आहे. अंजनगांव सुर्जी, अचलुर, परतवाडा या भागात हे क्षेत्र आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा या भागातही केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आकोट व तेल्हारा हे दोन तालुके अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या भागातही केळी लागवड क्षेत्र वाढीस लागल्याने या भागात शासकीय अनुदानातून सुमारे सात रायपनिंग चेंबरची उभारणी केली आहे. अंजनगांव, परतवाडा परिसरात ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पैसे दिले जातात. दरम्यान, विभागात केळी लागवड सुमारे ५५७४ हेक्टर क्षेत्रावर पोचल्याने या भागात या पिकांकरीता स्वतंत्र संशोधन केंद्र असावे असा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला दिला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत हा प्रस्ताव दिल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले आहे. अचलपुर येथे विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधक केंद्र असून त्याच परिसरात केळी संशोधन केंद्राची पायाभरणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. संशोधन केंद्रास मान्यता मिळेपर्यंत केळी संशोधन विषयक कार्य प्रभावित होऊ नये यासाठी विद्यापीठाने उद्यानविद्या शाखेतील एका तज्ञांची नियुक्ती केली आहे. आकस्मिक निधितून त्याकरीता ९१ लाख रुपयांची तरतूद करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.