शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पेढी कोपली; हाहाकार

By admin | Updated: July 12, 2016 01:12 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला,

विस्कळीत : नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, देवरा, फाजलापूर, दोनद, खानापूरला फटकाअमरावती : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, पर्वतापूर, देवरा, सावंगा, फाजलापूर, दोनद आणि खानापूर या गावांत नदी-नाल्यांनी थैमान घातले. नदीकाठच्या या सर्वच गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोमवारी पूरबाधित गावांना भेटी दिल्या. अमरावती व भातकुली तालुक्यातील एकूण १३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुरामुळे अनेक घरी रविवारी व सोमवारी चुली पेटल्या नाहीत. धान्य ओले झाले. घरातील साहित्य वाहून गेले. गोठ्यातील जनावरांनाही पुराचा फटका बसला. प्रशासन नैसर्गिक आपत्तीवर यश मिळविण्यासाठी धडपडत असले तरी पुराच्या फटक्यानंतर आता महामारीचा मोठा धोका पुरबाधित लोकांसमोर उभा ठाकला आहे. पुरग्रस्त सर्वच गावांमध्ये तत्काळ प्रभावाने वैद्यकीय शिबिरे उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. जंतूनाशक औषधांची फवारणी आणि डस्टींग वृत्त लिहिस्तोवर करण्यात आलेली नव्हती. पुरबाधित गावांमधील वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी आवश्यक त्या विशिष्ट सुविधा आरंभण्यात आलेल्या नव्हत्या. सर्वत्र दूषित वातावरण असल्याने डायरियाचा त्रास गावकऱ्यांना सुरु झाला आहे. गाद्या, कपडे ओलेचिंब झाल्याने गावकऱ्यांचे थंडीने हाल होत आहेत. पाच तालुक्यात अतिवृष्टी: पाच तालुक्यातील २५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे. खोलगट भागात पाणी शिरल्याने ३०० च्या वर कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ५ हजारांवर हेक्टरमधील शेतीत पाणी साचल्याने पिके धोक्यात आलेली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५५.८ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये अचलपूर ९३.२ मिमी, दर्यापुर ८०.३, अंजनगांव सुर्जी ७९ मिमी, धारणी ७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात १७२.२ मिमी पाऊस पडला. ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस असल्याने ही अतिवृष्टी समजण्यात येते. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या दुथडी भरुन वाहत आहे. भातकुली तालुक्यात रविवारी सायंकाळी पेढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सावंगा, देवरा, फाजलापूर व जावरा या गावांचा संपर्क तुटला होता. नया अकोला, वलगांव, खानापूर, थुगांव,दोनद, पर्वतापूर रोहनखेड्यात पाणी शिरले.