शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जामठीच्या शिक्षकांनी जपला सावित्रीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले जयंती विशेष : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

संजय जेवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामठी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही कहाणी. गावाची लोकसंख्या २२५ आणि कुटुंबसंख्या ७५ च्या आसपास. येथील ९५ टक्के नागरिक धनगर समाजाचे असून, मेंढीपालन हा त्यांच्या उपजीविकेचा मोठा आधार. त्यामुळे पाठीवर बिºहाड घेऊन गावोगावी फिरणे आलेच. मुलाबाळांना घेऊन चराईसाठी जागा मिळेल तेथे त्यांचा बेडा असतो. मग त्यांच्या मुला-मुलींना कुठले शिक्षण? मात्र, शिक्षकांनी त्यावरही उपाय शोधून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. २०१० मध्ये येथे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेला सुरुवात झाली. इमारत नसल्याने गुरांचा गोठा हीच शाळेची इमारत होती. त्यावेळी हजेरीपटावर मुलांची संख्या ४५ असली तरी प्रत्यक्षात १९ विद्यार्थी शाळेत दिसायचे. तत्कालीन शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक उमेश मारोतराव शिंदे यांनी शोध घेतला तेव्हा बहुतांश मुले बेड्यावर आढळले. त्यांनी या पालकांना विश्वास दिला आणि घरी असलेल्या आजी-आजोबांच्या भरवशावर त्यांना सोडण्याची विनंती केली. त्यांची धडपड पाहून पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळले. शिंदे हे बेड्यावरून या मुलांना शाळेत घेऊन आले आणि त्यावेळी या मुलांच्या राहण्याची, भोजनाची, आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली. यासाठी शाळेतील सहायक शिक्षक अलका राजेंद्र नेरकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली.शाळाबाह्य असलेली ही मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच डिजिटल क्लासरूमसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधेसोबत शिक्षण घेत आहेत.आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांप्रति शिक्षकांची तळमळ हेच जामठीच्या शाळेचे यश आहे. या शिक्षकांमुळेच आजही सावित्रीबार्इंचा वसा जपला जात आहे.- प्रवीण खांडेकर, गटशिक्षणाधिकारी, पं.स.अनेक पिढ्यांपासून रानोरान फिरत तेथेच वास्तव्य करीत होतो. पण, या शाळेमुळे आमची मुले शिकू लागली आहेत. येथील शिक्षक घरोघरी फिरून मुले शाळेत आणतात आणि त्यांची सर्व काळजी घेतात.- सुखाभाऊ टेळे, माजी सरपंच, जामगाव (जामठी)