शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

र्विन चौकात जनसागर लोटला : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By admin | Updated: April 15, 2016 00:15 IST

मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सव गुरुवारी विविध सामाजिक संघटना, ...

अमरावती : मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सव गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांद्वारे जल्लोषात साजरा करण्यात आला. इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता येथील इर्विन चौक, बडनेरा येथील अशोकनगरातील पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात तसेच ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी जयघोषात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. पुढे गुरूवारी दिवसभर महामानवाला आदरांजली अर्पण करण्याकरिता अनुयायांची रीघ लागली होती. इर्विन चौकात रिपाइं (गवई गट) च्यावतीने १२५ किलो वजनाचा केक कापण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त बुधवारी रात्रीपासूनच इर्विन चौकात आबालवृध्दांनी गर्दी केली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे समन्वयक किशोर बोरकर यांच्या पुढाकाराने सावलीसाठी कॅरिडोर तयार करण्यात आला होता. या कॅरिडोरला लागूनच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छायाचित्रे, प्रतिमा, गौतम बुद्धांच्या प्रतिमा, हार आणि फुलांची दुकाने लक्ष वेधून घेत होती. याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाज प्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्धांसह आंबेडकरांच्या प्रतिमांची मोठी विक्री झाली. बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धांची चित्रे अंकित असलेल्या माळा, लॉकेट, साखळी, हँडबेल्ट, मूर्ती आदी साहित्याचीदेखील रेलचेल होती. बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत, यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे तसेच विविध राजकीय पक्षांनी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी पाणी, सरबत तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. बसपाद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केले. एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी जैन संघटनेचे सुदर्शन गांग होते. स्वागताध्यक्षपदी संगीता शिंदे होत्या. यावेळी अतिथी म्हणून आ. श्रीकांत देशपांडे, आ. रवि राणा, प्रभारी कुलगुरू विलास सपकाळ, जिल्हाधिकारी किरण गित्ते, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, संजय खडसे, राजू नन्नावरे, गोविंद कासट, सुरेखा नन्नावरे, पुरुषोत्तम हरवानी, एम. ए. काबरा उपस्थित होते. गायक मोहन इंगळे यांच्यासह सूरज जवळकर, मुश्ताक भाई यांनी बुद्ध-भीमगीते सादर केली. आंबेडकर आयुर्वेद मेडिकोज विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या चमुने शिबिरातून रूग्णांची तपासणी केली. (प्रतिनिधी)