शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जामगावात आग, सात घरे बेचिराख

By admin | Updated: April 14, 2016 00:04 IST

जामगाव (खडका) येथील झोपडपट्टी परिसरात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

वरूड तालुक्यातील घटना : महिलांसह चिमुरडे बेघर, लाखोंची हानी वरूड : जामगाव (खडका) येथील झोपडपट्टी परिसरात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये सात घरांची राखरांगोळी झाली. त्यामुळे सात कुटुंब उघड्यावर आले असून १० लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे. वरुड, मोर्शी, शेंदूरजनाघाटच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही भीषण आग आटोक्यात आली. जामगाव (खडका) येथे अचानक झोपडपट्टी परिसरात आग लागली. ग्रामस्थांनी आगीची महिती बेनोडा पोलिसांना दिली. त्यानंतर वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषद तसेच मोर्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत सातही घरांची राखरांगोळी झाली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी प्राणहानी मात्र टळली. बेघर झालेल्या कुटुंबांमध्ये देवराव मंगल कुडसिंगे, देवल हरिसिंग उईके, वासुदेव श्रीराम वाढिवे, सेवाराम मंगल कुडसिंगे, लीलाबाई सुखदेव तिडगाम, रामदास बाजी धुर्वे, बाजी तिरकाम धुर्वे यांचा समावेश आहे. घटनास्थळावर नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, बेनोडा पोलिसांचे पथक, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच सामाजिक कार्यकतेर् नरेंद्र चोरे, सरपंच महेंद्र भुजाडे, उपसरपंच, ग्रामसदस्यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविली. या आगीत सातही घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. ग्रामस्थांनी वर्गणी करुन सात हजार रूपयांची रक्कम अग्निग्रस्तांना दिली. महसूल विभागासह ग्रामपंचायतीने एका हॉलमध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था करून धान्य दिले. सेवाभावी संस्थाना आवाहन करुन या अग्निपीडितांना मदत करण्याचे आवाहन केले. वेळेवर अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. महसूल विभागाच्यावतीने सर्व अग्निपीडितांना तातडीची प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून लोकसहभागातून या कुटुंबांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी सांगितले. या अग्निकांडांमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गावकऱ्यांनी पुढे येऊन या आदिवासी कुटुंबांना मदत दिली. शासनाने या अग्निपीडितांना तातडीची मदत देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिधीनी)