शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधा निधीचा मुद्दा निकाली

By admin | Updated: May 13, 2015 00:17 IST

जिल्हा परिषदेत मागील काही महिन्यांपासून जनसुविधा निधी वितरणाचा मुद्दा विविध कारणांमुळे रखडून पडला होता.

अमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही महिन्यांपासून जनसुविधा निधी वितरणाचा मुद्दा विविध कारणांमुळे रखडून पडला होता. हा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभेचा मुहूर्त जिलहा परिषद प्रशासन अनेक दिवसांपासून शोधत होते. अखेर १० मे रोजी पार पडलेल्या डीपीसीच्या बैठकीत जनसुविधेचा प्रश्न पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सर्वसंमतीने निकाली काढला.या निर्णयामुळे वादग्रस्त मुद्दयातून सुटका झाल्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.जिल्हा परिषदेला जनसुविधेच्या कामासाठी सन २०१४/२०१५ मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे ४ कोटी ५७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये विविध तालुक्यातील सुमारे १३३ कामांचा यात समावेश होता. मात्र जनसुविधेचा उपलब्ध निधी हा जिल्हा परिषद सदस्यांना समसमान वाटप न करण्यात आल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे काही सदस्यांनी केली होती. त्यामुळे जनसुविधेचा मुद्दा वादग्रस्त ठरला. काही महिन्यांपासून या विषयावर बैठका झाल्यात. यावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये समसमान निधी वाटपाबाबत समज गैरसमज दूर झाल्यानंतर प्रशासनाने जनसुविधा कामांच्या यादीला जिल्हा नियोजन समितीची मंजुरी नसल्याने जिल्हा परिषदेला निधी वितरणास नकार दिला होता. त्यामुळे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतुत्वात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, व सदस्य यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन त्यांना जनसुविधेचा निधी वितरित करण्याची मागणी केली होती. दरम्यान जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या यादीला जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यामुळे रविवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वानुमते मांडण्यात आला. त्यावर वर्षभरापासून रखडलेले जनसुविधेचे भिजतघोंगडे अखेर निकाली काढण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमार्फत सदस्यांनी सुचविलेली विविध तालुक्यातील जनसुविधेचे कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षभरापासून समसमान निधी वाटपाच्या मुद्यावर जनसुविधेचा निधी वितरण प्रक्रियादेखील थंडबस्त्यात पडली आहे. तरीदेखील जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिल्याने योजनेच्या कामाचा पप्पू पास झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)