शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंबा नाल्यातील पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

अमरावती : अंबा नाल्यात पडल्याने एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी लालखडी स्थित पुलाजवळ घडली. किशोर पाडुरंग मोटघरे ...

अमरावती : अंबा नाल्यात पडल्याने एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी लालखडी स्थित पुलाजवळ घडली. किशोर पाडुरंग मोटघरे (४८ रा. सुकळी) असे मृताचे नाव आहे. रत्नपाल किशोर मोटघरे (२१, रा. सुकळी) यांच्या माहितीवरून नागपुरी गेट पोलिसांनी घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे यांनी केला.

0000000000000000000000

छत्री चौकात आढळला वृध्दाचा मृतदेह

अमरावती : बडनेरा येथील जुन्या बसस्थानकाजवळ शनिवारी ६० ते ६५ वयोगटातील वृध्दाचा मृतदेह आढळून आला. माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. या घटनेत बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी केला.

00000000000000000000

दोन अवैध दारू अड्ड्यावर धाडी

अमरावती : शहर पोलिसांनी विविध ठिकाणच्या दोन अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकून तीन आरोपींना अटक केली. नागपुरी गेट पोलिसांनी रतनगंज नाल्याजवळील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून भगवानदास अहेरवार (२४ रा. मसानगंज) याला अटक केली. त्याच्याकडून ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वलगाव पोलिसांनी शिराळा गावातील पुलाजवळ ऋषिकेश रामदास काटोले (२०) व वैभव पंजाब तिखिले (२७ दोन्ही रा. नारायणनगर, चांदूर बाजार) यांच्या ताब्यातून दारू व दुचाकी असा ३९,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

0000000000000000000000

शस्त्रांची दहशत पसरविणाऱ्या तिघांना अटक

अमरावती : तलवार, चाकू व गुप्तीसारखे धारदार शस्त्र हाती बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तीन तरुणांना राजापेठ पोलिसांनी २० जून रोजी हमालपुरा स्थित करण बारसमोरून अटक केली. सूरज विलास चावरे (३०), अमित प्रकाश सवई (२३) व सौरभ संजय घरडे (२३ तिन्ही रा. हमालपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार, चाकू व गुप्ती पोलिसांनी जप्त केले.