शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

प्रखर देशभक्ती, हास्य व्यंगाने रंगली मैफल

By admin | Updated: May 4, 2016 00:28 IST

कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या कविता तर सुरेंद्र शर्मा यांच्या ....

महाराष्ट्र दिनाचे औचित्य : मराठी-हिंदी हास्य कविसंमेलनात अमरावतीकर लोटपोट अमरावती : कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या कविता तर सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नीवरील व्यंगबाण व पदमश्री अशोक चक्रधर यांच्या मनोरंजक व भावस्पर्शी हिंदी कविता तर अशोक नायगावाकर, अरुण म्हात्रे व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या मराठी हास्य कविता व किस्स्यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावरील हजारो प्रेक्षकांना लोटपोट केले. प्रखर देशभक्ती व हास्यरसात सोमवारच्या रात्रीची मैफल चांगलीच रंगली. जाणता राजा वेलफेयर सोसायटीच्या वतीने आयोजित हिंदी मराठी हास्य कविसंमेलनात अशोक नायगावकर यांच्या लोकमान्य टिळकावरील गाजलेल्या कवितेने कविसंमेलनाला प्रारंभ झाला. या कवितेच्या दरम्यान नायगावकर यांनी दैनंदिनी जीवनातील अनेक खुमासदार किस्से सांगून मैफिलीत रंग भरला. रामदास फुटाणे यांच्या ‘कटपीस’ या कवितेतून सामाजिक जाणिवेसह जीवनातील वास्तविकता स्पष्ट झाली. अरुण म्हात्रे यांच्या गझल गायकीने कवितेतील श्रृंगार व प्रेम प्रेक्षकांसमोर उलगडले. कारगीलच्या युद्धात सहभागी झालेले व ३० वर्षे सैन्यात सेवा देणारे कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभावनेच्या कवितांनी वातावरण भारावून गेले होते. तसेच सैन्याची वास्तविकता त्यांच्या कवितेतून रसिकांसमोर उलगडली. त्यांनी सादर केलेल्या कवितेच्या दरम्यान भारत माता की जय म्हणून टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. हास्य खजिना म्हटल्या जाणारे सुरेंद्र शर्मा यांनी घरवालीवर केलेल्या टिप्पणीवरून तसेच हास्य रचनांवरून संपूर्ण अमरावतीकरांना लोटपोट केले. पद्मश्री अशोक चक्रधर यांनी राजकारणावर टीका तर पारिवारिक लहान गोष्टींवरून कविता कशा निर्माण होतात तसेच जीवनामध्ये फक्त प्रेमच ही शक्ती आहे. जी आपल्या एकमेकांशी बांधून ठेवते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोमेश्वर पुसतकर यांनी केले. (प्रतिनिधी)