शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील दहा पिकांसाठी विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:28 IST

जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री विमा योजना : कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक, २४ जुलैपर्यंत प्रस्ताव बँकेकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यासह अंतिम प्रस्ताव बँकेकडे २४ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान, सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हा या योजनेचा उद्देश आहे. विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता योजनेंतर्गत राज्यात सन २०१९-२० साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या पीककर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. खातेदाराशिवाय कुळांचे अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रबी हंगामासाठी १.५० टक्के असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.यंदाच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. यासंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज