शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाला विम्याचे संरक्षण कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान ...

ठळक मुद्दे२५ जुलै डेडलाईन : अधिसूचित १५ पिकांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराशिवाय कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांना दोन टक्के, तर रबी हंगामासाठी व नगदी पिकांसाठी पात टक्के विमा भरावयाचा आहे. या योजनेंतर्गत पाच टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे.जिल्हा समिती घेणार आढावाप्रत्येक हंगामाच्या वेळी कृषी विभागाद्वारा कृषीविषयक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण व सनियंत्रण करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सदस्य व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समितीचे सचिव राहणार आहेत.अशी होणार नुकसानभरपाई निश्चितशासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नावर नुकसानभरपाई आधारित राहणार आहे.एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असल्यास, सर्व विमाधारक शेतकºयांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल.नुकसानभरपाईचे निकषअधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकाच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्क््यांपेक्षा कमी असल्यास सर्व अधिसूचित क्षेत्र नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहे. विमा कंपनी व राज्य शासनाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनंतर विमा कंपनीद्वारा नुकसानाचे प्रमाण व द्यावयाची भरपाई याबाबत ठरविले जाणार आहे.भरपाईसाठी अधिसूचित क्षेत्र घटक ग्राह्यपिकाच्या नुकसानभरपाईसाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाधिकाºयांनी अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरणा केला व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून हप्ता कपात करण्यात आला, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहे. अपेक्षित भरपाईच्या २५ टक्क््यांपर्यंत रक्कम आगाऊ देण्यात येईल.