शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर, थिलोरी मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

दर्यापूर तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ...

दर्यापूर तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पात्र होती. यंदाच्या खरीप पेरणीच्या अनुषंगाने ती रक्कम तातडीने मिळावी, यासाठी शेतकरी वारंवार तहसील कार्यालय, कृषी विभाग कार्यालय येथे फेऱ्या मारत होते. खरीप २०२० मध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व ज्वारी या पिकांसाठी ३७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी ४० हजार ५३६ हेक्‍टरसाठी विमा काढलेला होता. दर्यापूर तालुक्यात उडीद पिकाचा विमा मंजूर झाला. मात्र, दर्यापूर व थिलोरी या दोन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विमा रक्कम मिळाली नव्हती. या दोन महसूल मंडळांमध्ये ३८५१ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७३ लाख ४७ हजार ९२८ रुपये मूग या पिकासाठी मंजूर झाले होते. मात्र, विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पाच महिने विमा रकमेपासून वंचित राहावे लागले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा चांगलेच धारेवर धरले होते. अखेर विमा कंपनी नमली व त्यांनी शेतकऱ्यांना १० जुलैपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका मागे घेतली. गुरुवार रोजी थिलोरी व दर्यापूर या दोन्ही मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा झाली आहे.

080721\184853e.jpg

दर्यापूर थिलोरी मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा... शेतकर्‍यांच्या आंदोलनाला मिळाले यश