शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्याची कामे मार्गी लावण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश ...

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिले.

पाणीटंचाई आराखड्यानुसार, ७९७ गावांत ८५२ उपाययोजनांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५९ गावांतील १६३ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्यात चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी, सोमारखेडा, मलकापूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या सहा गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात २९ गावांत १५ विंधन विहिरी व १८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तीन, भातकुली तालुक्यात एक, मोर्शी तालुक्यात विंधन विहिरी व खासगी विहिरी मिळून सहा, वरूड तालुक्यात एक, चांदूर रेल्वे तालुक्यात सात, अचलपूर तालुक्यात आठ बोअरवेल व एक खासगी विहीर, चिखलदरा तालुक्यात सहा विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. टंचाई आराखड्यात विंधन विहीर, कूपनलिका घेणे, नळ योजनांची, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, खासगी विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील ३६ नळ योजना पूर्ण करणे असा ७९७ गावांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यातील १६३ उपाययोजनांसाठी ५ कोटी ९० लक्ष निधी मंजूर आहे. सद्यस्थितीत ९४ गावांत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी २ कोटी ३ लक्ष खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची ७२ कामे प्रस्तावित असून, त्यासाठी १ कोटी ८७ लाख रुपये, तर मंजूर ६५ कामांसाठी ३ कोटी ७८ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.