शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा येथील स्कायवॉकची विकासकामे मार्गी लावण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:01 IST

चिखलदऱ्यात उभारण्यात येत असलेला स्कायवॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्कायवॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन अधिग्रहित करावी किंवा इतर पर्याय तपासून पहावे. जमीन अधिग्रहण आवश्यक असल्यास त्यासाठी किती जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, हे तपासून थेट खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदऱ्यातील स्कायवॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे पर्यटकांची संख्यावाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व विभागांनी येथील विकासकामे करावीत, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदारा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, धारणीचे तहसीलदार वैभव पाटोळे, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माने उपस्थित होते.चिखलदऱ्यात उभारण्यात येत असलेला स्कायवॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्कायवॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन अधिग्रहित करावी किंवा इतर पर्याय तपासून पहावे. जमीन अधिग्रहण आवश्यक असल्यास त्यासाठी किती जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, हे तपासून थेट खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. विकास प्रकल्प पूर्ण झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने जमीन अधिग्रहणासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. स्काय वॉकचे काम पूर्णत्वास येत आहे. केबलचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करून परवानगी वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावे. स्कायवॉकवर जाण्यासाठी आवश्यक असलेली जागा कोणत्या प्रकारे उपलब्ध होईल, याची तपासणी करावी. चिखलदारा येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी येथील पर्यटक आणि रहिवाशांना लागणाऱ्या पाण्याची माहिती घेण्याच्या सूचनाही ना. कडू यांनी दिल्यात. प्रशासनस्तरावर अडचणी येऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू