शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘ओ निगेटिव्ह’ऐवजी रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:31 IST

किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमहिला कर्मचाऱ्याचा प्रताप : सुपर स्पेशालिटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, नातेवाईकांची पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.रुग्णालयातील महिला कर्मचाºयाने मोबाइलवर बोलत असताना रक्त चढविले. रुग्णाला देत असलेल्या रक्ताचा गट कोणता, याची शहानिशा करण्याचे भानही या कर्मचाºयाने राखले नाही, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. सुपर स्पेशालिटीचा चव्हाट्यावर आलेला भोंगळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. नातेवाइकांच्या माहितीनुसार, शीला नवीन मेश्राम (रा. परसापूर) १५ नोव्हेंबर रोजी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेकरिता विभागीय संदर्भीय रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे दाखल झाल्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेपूर्वी ‘ओ निगेटिव्ह’ रक्त उपलब्ध करण्यास सांगितले. शीला यांचा मुलगा शुभम मेश्राम रक्त रक्तपेढीत गेला. यादरम्यान त्यांना रुग्णालयातून कॉल आला. शीला मेश्राम यांचे ब्लडप्रेशर वाढल्यामुळे त्यांना अतिदक्षता कक्षात हलविल्याचे सांगण्यात आले. शुभमने तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. वॉर्डमधील लोकांना शुभमला सांगितले की, राठोड नामक शेजारच्या बेडवरील रुग्णासाठी आणलेले ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त शिला मेश्राम यांना चढविण्यात आले. त्यामुळे रिअ‍ॅक्शन झाली आणि त्यांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले.महिला कर्मचाºयाच्या निष्काळजीपणामुळे शीला मेश्राम यांची प्रकृती बिघडल्याच्या माहितीवरून शुभमचे सहकारी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल ठाकरे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांना परिचारिका व डॉक्टर यांच्यापैकी कुणीही काहीच माहिती नसल्याचे सांगितले.रक्त देताना कर्मचारी फोन कॉलवरसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी शीला मेश्राम यांना रक्त चढवित असताना त्यांना मोबाइलवर कॉल आला. महिला कर्मचाºयाने कॉल सुरू ठेवूनच ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त चढविल्याचे शुभमचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर वॉर्डात ‘आॅन कॉल’ ड्युटी कोणाची आहे, ही बाबसुद्धा तेथील कर्मचाºयांना माहिती नसल्याचे प्रफुल्ल ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारशुभम मेश्रामने या गंभीर प्रकाराची तक्रार शुक्रवारी सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली. यासंबंधाने पोलीस जिल्हा शल्यचिकित्सकांशी पत्रव्यवहार करणार आहेत. प्रफुल्ल ठाकरे यांनी शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी संपर्क करून हा गंभीर प्रकार त्यांना कळविला. पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती प्रफुल्ल ठाकरे यांनी दिली.रुग्णाला विचारणा करीत आहोत. नेमके काय घडले, हे अद्याप माहिती पडले नाही. नर्सची चुकी असेल, तर कारवाई करू.- पी.बी. भिलावेकरविशेष कार्य अधिकारीसुपर स्पेशालिटी