शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिशाभूल करून कॅश चोरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:49 IST

खरेदीच्या बहाण्याने व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन काऊंटरवरील रोख लंपास करणारा कुख्यात चोर कपिल भाटी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. आरोपी कपिल भाटीने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने खोलापुरी गेट व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.

ठळक मुद्देदोन गुन्ह्यांची कबुली : खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरेदीच्या बहाण्याने व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन काऊंटरवरील रोख लंपास करणारा कुख्यात चोर कपिल भाटी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. आरोपी कपिल भाटीने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने खोलापुरी गेट व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.सराफा बाजार परिसरातील निर्मला अशोक सोनी यांच्या आइस्क्रीम पार्लरमधून २८ जून रोजी अज्ञात चोरांनी २१ हजारांची रोख लंपास केली. एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी आइस्क्रीम मागण्याच्या बहाण्याने गल्ल्यातून रोख चोरून नेली होती. ३० जून रोजी या घटनेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या तक्रारीच्या अनुषंगाने खोलापुरी गेट व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून या गुन्ह्यात कपिल भाटी व त्याच्या अल्पवयीन साथीदाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रकाश जगताप, विजय पेठे, विनय मोहोड, पवन घोम, सय्यद इमरान व गजानन सातंगे यांनी कपिलला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले.दोघांच्या चौकशीदरम्यान आरोपींनीे सराफा बाजार व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोदानगर येथील एका साडी सेंटरमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीसाठी कपिल भाटीला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कपिल भाटीवर पाच गुन्हेआरोपी कपील भाटीविरुद्ध यापूर्वी विविध ठाण्यांत पाच गुन्हे दाखल आहेत. व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन, त्यांची दिशाभूल करून काऊंटर व गल्ल्यातील रोख लंपास करण्याची पद्धत कपिल भाटीची आहे. चोरी केलेल्या पैशांतून तो मौजमस्ती करीत असल्याचे आढळून आले आहे.