शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर खोड किडीचा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST

सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही.

ठळक मुद्देबच्चू कडू शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील सोयाबीन पिकावर 'येलो मोझॅक' रोगाने अटॅक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू हे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही. काही बियाणे उगवले असले तरी येलो मोझॅकसारख्या विविध रोगामुळे फटका बसला आहे. कुरळपूर्णा भागातील एका शेतात चक्क सोयाबीन पीक बकºयाच्या चाऱ्यासाठी खुले केले आहे. याची गंभीर दखल घेत पं.स.सदस्य संतोष किटुकले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती दिली. यावेळी दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू थेट कुरळपूर्णा येथील शेतकरी वैभव धाकडे यांच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांना माहिती विचारली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांचाच समाचार घेतला. जिल्हा कृषी अधीक्षकांना पीकपाहणीचे आदेश दिले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दांडेगावकर, तहसीलदार अभिजित जगताप व शेतकरी उपस्थित होते.यंदा पहिल्यांदा पेरलेले सोयाबीन उगवले नाही. जे उगवले ते हातात येण्यापूर्वी खराब झाल्यामुळे राज्यातील कृषी विभागावर शंका व्यक्त होत आहे. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.- बच्चू कडू, राज्यमंत्री, महराष्ट्र शासनकारवाईचे आदेशमहाबीजने बाजारातील २ ते ३ हजार रुपये क्विंटलचे निकृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करून शेतकºयांना ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती