शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हांच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस पथक

By admin | Updated: June 14, 2015 00:28 IST

शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारीच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

१२ इन्व्हेस्टिगेशन पथके : अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षणअमरावती : शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारीच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. या उद्देशाने आता स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांमध्ये १२ इन्व्हेस्टिगेशन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शनिवारपासून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून १ जुलैपासून प्रत्येक ठाण्यामधील गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास पथके करणार आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनी संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये स्वंतत्र तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील दहा पोलीस ठाण्यांतर्गत स्वतंत्र तपास पथक तयार करण्यास सुरुवात झाली आहे. गाडगेनगर व बडनेरा पोलीस ठाणे ए दर्जाचे स्थान देण्यात आले असून तेथे प्रत्येकी दोन पथके सज्ज राहणार आहेत. अन्य आठ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक सज्ज राहणार आहे. या सर्व ठाण्यात विधी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच एकूण ७६ पोलीस कर्मचारी पथकात सहभागी राहणार आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तपासकार्यात कोणताही त्रुटी आढळून येऊ नये. याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. सखोल चौकशीअंती न्यायालयात गेलेले प्रकरणात आरोपीला शिक्षा व्हावी, या उद्देशान ही पथके तयार करण्यात आली आहे. शहरात मंत्री दौरे, बंदोबस्त व वेळेवर येणाऱ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज असते. त्यामुळे गंभीर गुन्हाच्या तपासात पोलीस यंत्रणा वेळ देऊ शकत नाहीत. याचा परिणाम आरोपीच्या शिक्षेवर होतो. शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने सखोल तपास होणे आवश्यक असल्यामुळे ही पथके तयार करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण होणार असल्याचा विश्वास उपायुक्त घार्गे यांनी व्यक्त केला आहे.